तीन महिन्यात २०,४८४ जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 10:01 AM2020-09-30T10:01:04+5:302020-09-30T10:01:16+5:30

तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २० हजार ४८४ जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली.

Punitive action against 20,484 people in three months! | तीन महिन्यात २०,४८४ जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई!

तीन महिन्यात २०,४८४ जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई!

Next

अकोला : जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी प्रशासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत असतानाच, १ जुलै ते २८ सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २० हजार ४८४ जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, ३५ लाख ९० हजार ७५९ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी मास्कचा वापर करणे, गर्दी न करता ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे; मात्र जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असताना, नियमांचे पालन होत नसल्याने, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनामार्फत दंडात्मक कारवाई येत आहे. अकोला पोलीस विभाग, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या इत्यादी विभागामार्फत गत १ जुलै ते २८ सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात ‘मास्क’विना रस्त्यावर फिरणे तसेच ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे पालन न करणे इत्यादी नियमांचे उल्लंघन करणाºया २० हजार ४८४ जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यामध्ये ३५ लाख ९० हजार ७५९ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

नियमांचे उल्लंघन; ३,१५६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल!
कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत लागू करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’मध्ये २२ मार्च ते २८ सप्टेंबर या कालावधीत नियमांचे उल्लंघन करणाºया जिल्ह्यातील ३ हजार १५६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आहेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी सांगितले.

Web Title: Punitive action against 20,484 people in three months!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.