मूर्तिजापुरात मास्क न घालणाऱ्या २५१ नागरिकांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:33 AM2021-02-18T04:33:21+5:302021-02-18T04:33:21+5:30

कोरोनाचा पुन्हा उद्रेक सुरू झाला असून कोरोना योद्ध्येच कोरोनाची शिकार ठरत असल्याने पुनश्च कोरोना संकट गडद होत आहे. ...

Punitive action against 251 citizens who did not wear masks in Murtijapur | मूर्तिजापुरात मास्क न घालणाऱ्या २५१ नागरिकांवर दंडात्मक कारवाई

मूर्तिजापुरात मास्क न घालणाऱ्या २५१ नागरिकांवर दंडात्मक कारवाई

googlenewsNext

कोरोनाचा पुन्हा उद्रेक सुरू झाला असून कोरोना योद्ध्येच कोरोनाची शिकार ठरत असल्याने पुनश्च कोरोना संकट गडद होत आहे. या संकटावर मात करण्यासाठी नागरिकांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन, मास्कचा वापर व गृह विलगीकरणाकडे लक्ष देण्याची गरज आहे. मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने कारवाईची मोहीम तीव्र करीत, बुधवारी २५१ नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी मास्क न बांधणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. मंगळवारी २९ व बुधवारी १५ अशा ४४ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. १७ जणांवर सध्या येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून इतरांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. विविध शासकीय कार्यालयांत काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह काही नगरसेवकांचाही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. बुधवारी उप विभागीय पोलीस अधिकारी संतोष राऊत, ठाणेदार सचिन यादव, मंडळ अधिकारी महेश नागोलकर, सदानंद देशपांडे, राजेंद्र जाधव, सुनील डाबेराव, अनिल बेलाडकर, रामराव जाधव, सोनोने, आरोग्य निरीक्षक विजय लकडे यांनी कारवाई केली.

दररोज कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून येत आहेत. नागरिकांनी मास्क लावणे, गर्दी न करणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे, नियमितपणे सॅनिटायझरचा वापर करणे आदी नियम पाळावेत. अन्यथा कारवाई करण्यात येईल. - अभयसिंह मोहिते, उपविभागीय अधिकारी, मूर्तिजापूर

सुपरस्प्रेडिंगचा धोका विचारात घेऊन हेंडजच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये विलगीकरण कक्ष सुरू करण्यात येणार आहे. शहरात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी ७ पथके गठीत केली आहेत.

- विजय लोहकरे, मुख्याधिकारी, न. प. मूर्तिजापूर

Web Title: Punitive action against 251 citizens who did not wear masks in Murtijapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.