तेल्हारा येथे पथकाची दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:18 AM2021-03-28T04:18:11+5:302021-03-28T04:18:11+5:30
शहरात कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, नागरिक व व्यवसायिकांनी कोरोना नियमावलीचे पालन करावे. यासाठी स्थानिक प्रशासनाने ...
शहरात कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, नागरिक व व्यवसायिकांनी कोरोना नियमावलीचे पालन करावे. यासाठी स्थानिक प्रशासनाने एका पथकाचे गठन केले.पथकाने शनिवारी नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून आठ हजार रूपयांचा दंड वसूल केला.
तेल्हारा शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तहसील, नगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग यांच्या नेतृत्वाखाली एका पथकाचे गठन करण्यात आले. या पथकाच्या माध्यमातून व्यवसायिकांच्या दुकानात जाऊन फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क लावणे, स्वच्छता राखणे या त्रिसूत्री उपाययोजनांची पाहणी करण्यात आली. परंतु अनेक ठिकाणी कोरोना नियमावलीचे पालन होत नसल्याचे दिसून आले. पथकाने दोनशे रुपयापासून तर दोन हजार रुपयापर्यंत दंडात्मक कारवाई केली. व्यावसायिकांना कोरोना टेस्ट करणे बंधनकारक असल्याने व्यावसायिकांनी टेस्ट केली की नाही याची तपासणी करण्यात येत आहे.