भूमिहीन लाभार्थींसाठी २८ एकर जमीन खरेदी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:14 AM2021-06-26T04:14:57+5:302021-06-26T04:14:57+5:30
शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत अनुसूचित जातीमधील भूमिहीन व दारिद्र्यरेषेखालील लाभार्थींना प्रत्येकी ...
शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत अनुसूचित जातीमधील भूमिहीन व दारिद्र्यरेषेखालील लाभार्थींना प्रत्येकी चार एकर कोरडवाहू शेती किंवा दोन एकर बागायती शेतीचा लाभ देण्यात येतो. त्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत शासकीय दराने शेतजमीन खरेदी करण्यात येते. त्यानुषंगाने २०२०-२१ या आर्थिक वर्षात शासनाकडून उपलब्ध १ कोटी २ लाख ५० हजार रुपयांच्या निधीतून सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयामार्फत २८ एकर १८ गुंठे शेतजमीन शासकीय दराने खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, खरेदी करण्यात आलेली जमीन शंभर टक्के अनुदानावर वाटप करण्यासाठी लवकरच जिल्हास्तरीय समितीमार्फत भूमिहीन लाभार्थींची निवड करण्यात येणार आहे.
सात भूमिहीन लाभार्थींना
मिळणार जमिनीचा लाभ!
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयामार्फत शासकीय दराने २८ एकर शेतजमीन खरेदी करण्यात आली आहे. खरेदी केलेल्या जमिनीतून प्रत्येकी चार एकरप्रमाणे सातभूमिहीन लाभार्थींना जमिनीचा लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हास्तरीय समितीमार्फत भूमिहीन लाभार्थींची निवड करण्यात येणार आहे.
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत जिल्ह्यातील भूमिहीन लाभार्थींना शंभर टक्के अनुदानावर जमीन वाटप करण्यासाठी २०२०-२१ या आर्थिक वर्षात शासनाकडून प्राप्त १ कोटी २ लाख ५० हजार रुपयांच्या निधीतून २८ एकर शेतजमीन शासकीय दराने खरेदी करण्यात आली आहे. ही जमीन भूमिहीन लाभार्थींना वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हास्तरीय समितीकडून सात भूमिहीन लाभार्थींची निवड करण्यात येणार आहे.
उमा जोशी
समाजकल्याण निरीक्षक,
सहायक आयुक्त, सामाजिक न्याय विभाग, अकोला.