दुधाळ जनावरांची खरेदी २५ मार्च पर्यंत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:17 AM2021-03-18T04:17:52+5:302021-03-18T04:17:52+5:30
गतवर्षी दुधपूर्णा योजनेअंतर्गत ५२१ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ४१७ लाभार्थ्यांनी एक दुधाळ जनावर विकत घेतले होते व ...
गतवर्षी दुधपूर्णा योजनेअंतर्गत ५२१ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ४१७ लाभार्थ्यांनी एक दुधाळ जनावर विकत घेतले होते व केवळ २६ लाभार्थ्यांना दुसऱ्या दुधाळ जनावरांचा लाभ मिळाला होता. अंदाजे ३९१ लाभार्थी दुसऱ्या लाभाच्या प्रतिक्षेत आहेत. सदर लाभार्थ्यांना लाभ मिळावा, यासाठी या आर्थिक वर्षासाठी ३ कोटींची तरतूद करण्यात आली .जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या पात्र ६६४ अर्जांपैकी ५२१ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती. लाभार्थ्यांना प्रथम एक व नंतर दुसऱ्या दुधाळ जनावराचा लाभ देण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र गत आर्थिक वर्षात ते शक्य न झाल्याने दुसऱ्या लाभापासून वंचित लाभार्थ्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे अाता द्वितीय दुधाळ जनावरांच्या खरेदीसाठी लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांचा प्रस्ताव तयार करावा अािण खरेदी प्रक्रिया पूर्ण करुन २६ मार्चपर्यंत अहवाल सादर करावा, असा अादेश अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गट िवकास अधिकऱ्यांना िदला अाहे.