न्यायालयीन प्रकरणांच्या पाठपुराव्यासाठी ‘मॅनेज माय लॉ सुट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 03:31 PM2019-03-03T15:31:17+5:302019-03-03T15:31:45+5:30

आता जिल्हा परिषदेसंदर्भात दाखल सर्व प्रकरणे, त्यांची सद्यस्थिती, बाजू मांडण्यासाठी आवश्यक पूरक माहिती एका क्लिकवर पुढे येणार आहे.

For the pursuit of court cases, 'Manage My Law Suite' | न्यायालयीन प्रकरणांच्या पाठपुराव्यासाठी ‘मॅनेज माय लॉ सुट’

न्यायालयीन प्रकरणांच्या पाठपुराव्यासाठी ‘मॅनेज माय लॉ सुट’

Next

अकोला: जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या अनेक न्यायालयीन प्रकरणांची माहिती अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे न्यायालयात बाजू सक्षमपणे मांडली जात नाही. न्यायालयाचे निकाल विरोधात गेल्यामुळे जिल्हा परिषदांवर नामुश्की येते. ते प्रकार रोखण्यासाठी आता जिल्हा परिषदेसंदर्भात दाखल सर्व प्रकरणे, त्यांची सद्यस्थिती, बाजू मांडण्यासाठी आवश्यक पूरक माहिती एका क्लिकवर पुढे येणार आहे. त्यासाठी राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये ‘मॅनेज माय लॉ सुट’वर सर्वच विभागांची माहिती अपलोड करणे सुरू झाली आहे.
ग्रामविकास विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या सर्व कार्यासन आरमधील न्यायालयीन प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करण्याची तयारी झाली आहे. त्यासाठी ‘मॅनेज माय लॉ सुट’ ही संगणकीय प्रणाली भाडेतत्त्वावर घेण्यात आली. त्यामध्ये ग्रामविकास विभागाविरुद्ध राज्यातील विविध न्यायालयांमध्ये सुरू असलेल्या न्यायालयीन प्रकरणांवर देखरेख ठेवली जाणार आहे. सोबतच न्यायालयीन प्रकरणांत पाठपुरावा करण्यासाठी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना एका क्लिकवर सुनावणी, कागदपत्रांची माहिती मिळणार आहे. संगणकीय प्रणालीमध्ये माहिती अपलोड करण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांना फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच प्रशिक्षण देण्यात आले. त्यानुसार न्यायालयीन प्रकरणांची माहिती अपलोड करणे सुरू आहे.
- प्रकरणातील दंड, जप्ती टाळण्याचाही प्रयत्न
जिल्हा परिषद, राज्य शासनाविरुद्ध दाखल प्रकरणांत वेळेतच काही मुद्यांचा खुलासा न झाल्याने दंड, कार्यालयातील वस्तू जप्तीच्या घटनाही घडल्या. या प्रणालीमुळे आता प्रकरणांची अद्ययावत माहितीच अधिकारी-कर्मचाºयासमक्ष राहणार आहे. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत कोणत्या वेळी काय करावे, यावरही अधिकाºयांचे लक्ष राहणार आहे.
- पॅनेलवरील वकिलांवरही ‘वॉच’
जिल्हा परिषद, शासनाच्या विरोधातील प्रकरणात न्यायालयात बाजू मांडण्यासाठी पॅनेलवर ठेवलेले वकील विरुद्ध पक्षाशी हातमिळवणी करून त्यांना पूरक भूमिका घेतात. निकाल विरोधात गेल्याने त्याचा फटका जिल्हा परिषद, शासनाला बसतो. त्यामुळे एखाद्या प्रकरणात पॅनेलवर असलेल्या वकिलांची भूमिकाही अधिकाºयांच्या सतर्कतेने बदलता येते. वकील बदलण्याचीही संधी मिळते.

 

Web Title: For the pursuit of court cases, 'Manage My Law Suite'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.