दुचाकी चाेरट्यांचा शाेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:25 AM2020-12-30T04:25:48+5:302020-12-30T04:25:48+5:30
अकाेट शहरचा प्रभार विलास पाटलांकडे अकाेला : अकाेट शहर पाेलीस स्टेशनचे ठाणेदार संताेष महल्ले आजारी रजेवर असल्याने अकाेट शहर ...
अकाेट शहरचा प्रभार विलास पाटलांकडे
अकाेला : अकाेट शहर पाेलीस स्टेशनचे ठाणेदार संताेष महल्ले आजारी रजेवर असल्याने अकाेट शहर पाेलीस स्टेशनचा प्रभार काही दिवसांसाठी पाेलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमूख विलास पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. पाटील पथकाच्या कामगिरीसाेबतच अकाेट शहर पाेलीस स्टेशनची जबाबदारीही सांभाळत आहेत.
दाेन एसडीपीओंची पदे रिक्त
अकाेला : बाळापूर उपविभागीय पाेलीस अधिकारी आणि अकाेट उपविभागीय पाेलीस अधिकारी पद रिक्त आहे. पाेलीस निरीक्षक यांना पदाेन्नती मिळाल्यानंतर या दाेन ठिकाणी नियमती उपविभागीय पाेलीस अधिकारी मिळण्याची शक्यता हाेती. मात्र केवळ मूर्तिजापूर येथे उपविभागीय पाेलीस अधिकारी म्हणूण संताेष राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर बाळापूर आणि अकाेट येथील पद रिक्तच आहेत.
जनता भाजीबाजारात पुन्हा घाण
अकाेला : जनता भाजी बाजाराची नियमित साफसफाई हाेत नसल्याने या ठिकाणी पुन्हा घाण साचली आहे. या बाजारातील घाण साफ करण्याची मागणी भाजीविक्रेत्यांकडून करण्यात येत आहे. या घाणीत डुकरांचाही मुक्तसंचार असल्याने आजाराची भीती बळावली आहे.
दुचाकीचालक सुसाट
अकाेला : नेहरू पार्क चाैक ते तुकाराम चाैकापर्यंत सिमेंटराेडचे काम पूर्ण झाल्यानंतर या राेडवर दुचाकी चालक सुसाट वाहने चालवित असल्याचे चित्र आहे. या दुचाकीचालकांवर वाहतूक शाखेने कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी कारही वेगात जात असल्याची माहिती आहे. त्यामुळेच एका कारच्या अपघातात एकजण ठार, तर तीनजण जखमी झाले हाेते.
तुकाराम चाैकात अतिक्रमण
अकाेला : तुकाराम चाैक परिसरात माेठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. या परिसरातील काही औषधी दुकानांवर येणाऱ्या दुचाकीराेडवर लावण्यात येत असल्याने रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण हाेत आहे. याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.