वकील दिला नाही म्हणून ओबीसी आरक्षणाला धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:23 AM2021-09-15T04:23:21+5:302021-09-15T04:23:21+5:30
अकोला : आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकीलच दिला नाही, या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या ...
अकोला : आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी वकीलच दिला नाही, या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आरोपावर मुख्यमंत्री ठाकरे व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उत्तर द्यावे, असा जाब सरकारला विचारत भारतीय जनता पार्टीतर्फे उद्या १५ सप्टेंबर रोजी जिल्हाभर आंदोलन हाेत आहे. याबाबत भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी मंगळवारी पत्रकाद्वारे माहिती दिली असून, महाविकास आघाडी सरकारने ओबीसींचा विश्वासघात केल्याचा आराेप पत्रकात केला आहे.
इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला आघाडी सरकारने निधीही दिला नाही. या हलगर्जीपणाचा परिणाम ओबीसी आरक्षणाशिवाय ५ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यात झाला आहे. त्यामुळे या सरकारचा निषेध करण्यासाठी आयाेजित या आंदाेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन सावरकर यांनी केले आहे.
................