विविध साहित्य संस्थांतर्फे पुष्पराज गावंडे यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:15 AM2021-05-29T04:15:26+5:302021-05-29T04:15:26+5:30

यावेळी विदर्भ साहित्य संघ, अकोला, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाचकवडे, सचिव डॉ. विनय दांदळे, सहसचिव डॉ. प्रा. सुहास उगले, ...

Pushparaj Gawande felicitated by various literary institutes | विविध साहित्य संस्थांतर्फे पुष्पराज गावंडे यांचा सत्कार

विविध साहित्य संस्थांतर्फे पुष्पराज गावंडे यांचा सत्कार

Next

यावेळी विदर्भ साहित्य संघ, अकोला, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाचकवडे, सचिव डॉ. विनय दांदळे, सहसचिव डॉ. प्रा. सुहास उगले, अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंचाचे अध्यक्ष श्याम ठक, उपाध्यक्ष नीलेश कवडे सल्लागार प्रा. सदाशिव शेळके, कोअर कमिटी सदस्य नीलेश देवकर, मंचाचे सदस्य संजय गावंडे, भाषा अभ्यासक डॉ. रावसाहेब काळे, शब्दवेल साहित्य संस्थेचे प्रवीण बोपुलकर, जागर फाऊंडेशनचे तुळशीदास खिरोडकर, सृष्टी साहित्य संस्थेचे संतोष इंगळे, सतीश गावंडे, कबीर इंगळे, संवाद साहित्य मैफिलचे राजू चिमणकर,

विवेक मेतकर, कवी नारायणराव अंधारे, वऱ्हाडदूतचे सागर लोडम यांच्यासह अकाेल्यातील लेखक, साहित्यिकांची उपस्थिती हाेती.

--------------------

...हा तर वऱ्हाडी बाेलीचा सन्मान

महाराष्ट्र शासनाच्या मराठी विभागाच्या मंडळावर विदर्भातून माझी नियुक्ती हाेणे, हा माझा नव्हे; तर खऱ्या अर्थाने वऱ्हाडी बाेलीभाषेचा सन्मान आहे. विदर्भातील कसदार लेखन करणाऱ्या लेखक, साहित्यिकांच्या साहित्याची मंडळाच्या माध्यमातून दखल घेण्यात येईल. वऱ्हाडी बाेलीभाषेच्या जपणुकीसाठी मी प्रयत्नशील राहीन, असे विचार सत्कारप्रसंगी महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे नवनियुक्त सदस्य, ज्येष्ठ कादंबरीकार पुष्पराज गावंडे यांनी व्यक्त केले.

Web Title: Pushparaj Gawande felicitated by various literary institutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.