स्टेट बँकेत ‘क्यू मॅनेजमेंट’ प्रणाली!

By Admin | Published: November 28, 2015 02:29 AM2015-11-28T02:29:14+5:302015-11-28T02:54:27+5:30

ग्राहकांसह कर्मचा-यांची सुविधा.

'QM management' system in State Bank! | स्टेट बँकेत ‘क्यू मॅनेजमेंट’ प्रणाली!

स्टेट बँकेत ‘क्यू मॅनेजमेंट’ प्रणाली!

googlenewsNext

लोणार (जि. बुलडाणा): राष्ट्रीयीकृत बँकांमधील गुंतागुंतीचे व्यवहार आणखी सोयीस्कर व्हावेत, यासाठी प्रत्येक स्टेट बँकेमध्ये तालुका स्तरावर ह्यक्यू मॅनेजमेंटह्ण प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना आपल्या कामासाठी तासन्तास रांगेत ताटकळत उभे राहण्याची गरज भासणार नाही. स्टेट बँकेवर ग्राहकांच्या वाढत्या बोजामुळे सर्वसामान्य नागरिकांना पैसे भरणे अथवा काढणे, आरटीजीएस, वेतन ट्रान्सफर, धनादेश जमा करणे, एनएफटी, शासकीय चलान, पासबुक मुद्रण यासह ग्राहकांच्या विविध कामांसाठी, तसेच बँकेच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी बँकेकडून तालुका स्तरावर क्यू मॅनेजमेंट प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालींतर्गत ग्राहकांना कुपन देण्यात येते. कुपनवर नमुद नंबर आल्यावरच बँकेतील कोणत्या काऊंटरवर जायचे, याची माहिती घोषणा केली जाते. यामुळे कुपन घेतल्यानंतर ग्राहकांना नंबर येईपर्यंंत रांगेत थांबण्याची गरज पडत नाही.

Web Title: 'QM management' system in State Bank!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.