सासा-सुनांचे भांडणं अन् बापलेकांची उणीदुणी नियंत्रण कक्षात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:13 AM2021-01-01T04:13:42+5:302021-01-01T04:13:42+5:30
(प्रतिनिधी) सून, मुलगा व्यवस्थित बोलत नाहीत वृद्धावस्थेत माणसाची अवस्था अजाणत्या लहान मुलांप्रमाणे होते. याच वयात ते विविध स्वरूपातील आजारांनी ...
(प्रतिनिधी)
सून, मुलगा व्यवस्थित बोलत नाहीत
वृद्धावस्थेत माणसाची अवस्था अजाणत्या लहान मुलांप्रमाणे होते. याच वयात ते विविध स्वरूपातील आजारांनी जडलेले असतात. त्यामुळे त्यांना मायेची, आपुलकीची नितांत गरज भासते. असे असताना या ना त्या कारणांवरून सून, मुलगा व्यवस्थित बोलत नाहीत, खायला मिळत नाही, अशा ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी नियंत्रण कक्षाला प्राप्त होत आहेत.
२०२०मध्ये ६३०पेक्षा अधिक तक्रारी निकाली
नियंत्रण कक्षातील १०९० या टोल फ्री क्रमांकावर दाखल होणाऱ्या तक्रारींची तत्काळ दखल घेतली जात आहे.
नाव, पत्ता नमूद केल्यानंतर बीट जमादाराला संबंधित ज्येष्ठ नागरिकाच्या घरी पाठवून सून, मुलाला समज दिली जाते. या माध्यमातून २०२० या वर्षात ६३०पेक्षा अधिक तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. काही ज्येष्ठ नागरिक टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधतात; मात्र पुढून कुणीच बोलत नाही. केवळ घरातील भांडणाचा आवाज तेवढा येतो, असे प्रकारही घडत आहेत.
ज्येष्ठांच्या अधिक तक्रारी सुनेबाबत
टोल फ्री क्रमांकावर तक्रारी दाखल करणारे अधिकांश ज्येष्ठ नागरिक सुनेकडून अन्याय, अत्याचार होत असल्याचे गाऱ्हाणे मांडत आहेत. मुलगा सांभाळायला तयार आहे; पण सून घरातून निघून जायला सांगते, असे अधिकांश तक्रारी भराेसा सेल तसेच पाेलीस ठाण्यांमध्ये करण्यात येत आहेत.