थकबाकीदारांना कर्ज वाटपावर प्रश्नचिन्ह
By admin | Published: June 18, 2017 02:22 AM2017-06-18T02:22:50+5:302017-06-18T02:22:50+5:30
खरीप पेरण्या सुरू ; बँकांपर्यंत आदेश पोहोचलाच नाही.
संतोष येलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : थकबाकीदार शेतकर्यांना तातडीने दहा हजार रुपयांपर्यंत कर्ज वाटप करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला आहे; मात्र यासंबंधीचे आदेश अद्याप बँकांमार्फत पोहोचले नसल्याने, कर्ज वाटप सुरू करण्यात आले नाही. खरीप पेरण्या सुरू झाल्या; मात्र कर्ज वाटप सुरू करण्यात आले नसल्याने, जिल्हय़ातील थकबाकीदार शेतकर्यांना बियाणे आणि खते खरेदीसाठी दहा हजार रुपयांचे कर्ज केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राज्यातील अल्पभूधारक शेतकर्यांना तातडीने कर्जमाफी देण्यासह अटींच्या आधारे पाच एकरापेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी देण्यास शासनामार्फत तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, थकबाकीदार शेतकर्यांना खरीप पिकासाठी निविष्ठा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने १0 हजार रुपयांच्या र्मयादेपर्यंत तातडीने कर्ज देण्याचे आदेश शासनामार्फत देण्यात आले. त्यानुसार, ३0 जून २0१६ अखेर जिल्हय़ातील थकबाकीदार शेतकर्यांना बियाणे व खते खरेदीचा खर्च भागविण्यासाठी दहा हजार रुपयांपर्यंत ता तडीने कर्ज मिळणे अपेक्षित आहे; परंतु थकबाकीदार शेतकर्यांना कर्ज वाटप करण्याचा आदेश जिल्हय़ातील बँकांपर्यंत १७ जूनपर्यंत पोहोचले नाही. त्यामुळे थकबाकीदार शे तकर्यांना कर्ज वाटप करण्याची प्रक्रिया बँकांमार्फत अद्याप सुरू करण्यात आली नाही. जिल्हय़ात खरीप पेरण्या सुरू झाल्या; मात्र दहा हजार रुपयांपर्यंत कर्ज वाटप सुरू झाले नसल्याने, बियाणे व खते खरेदीचा खर्च भागविण्यासाठी थकबाकीदार शेतकर्यांना कर्ज केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पीक कर्जाचे वाटपही रेंगाळले; केवळ २८२ कोटी कर्जाचे वाटप!
यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्हय़ात ११४0 कोटी ५५ लाख रुपये पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. गत १ एप्रिलपासून जिल्हय़ात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके सह राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत पीक कर्जाचे वाटप सुरू करण्यात आले. उद्दिष्टाच्या तुलनेत १७ जूनपर्यंत जिल्हय़ात ३६ हजार ४७५ शेतकर्यांना केवळ २८२ कोटी ८९ लाख ७५ हजार रुपयांचे पीक कर्जाचे वाटप करण्यात आले. त्यामुळे जिल्हय़ात पीक कर्जाचे वाटपही रेंगाळले आहे.
पेरणीपूर्वी लाभ मिळणार?
आदेशाअभावी जिल्हय़ातील बँकांमार्फत थकबाकीदार शेतकर्यांना दहा हजार रुपयांपर्यंत कर्ज वाटपाची प्रक्रिया अद्याप सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे थकबाकीदार शेतकर्यांना खरीप पेरणीसाठी निविष्ठा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने दहा हजार रुपयांपर्यंत कर्ज तातडीने उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात जिल्हय़ातील थकबाकीदार शेतकर्यांना या कर्ज वाटपाचा लाभ खरीप पेरणी सुरू होण्यापूर्वी मिळणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
थकबाकीदार शेतकर्यांना तातडीने दहा हजार रुपयांपर्यंंत कर्ज वाटप करण्याबाबत शासनाचे आदेश जिल्हय़ातील बँकांच्या शाखांपर्यंत अद्याप पोहोचले नाही, त्यामुळे कर्ज वाटप करण्याचे काम अद्याप सुरू करण्यात आले नाही. आदेश पाहोचल्यानंतर बँकांमार्फत थकबाकीदार शेतकर्यांना दहा हजार रुपयांपर्यंंत कर्ज वाटपाचे काम मंगळवारपासून सुरू करण्यात येणार आहे.
-तुकाराम गायकवाड,
व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक.