पोलिसांच्या  ‘पेट्रोलिंग’वर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 05:48 PM2017-10-11T17:48:03+5:302017-10-11T17:48:22+5:30

Questioning the police's 'petroling' | पोलिसांच्या  ‘पेट्रोलिंग’वर प्रश्नचिन्ह

पोलिसांच्या  ‘पेट्रोलिंग’वर प्रश्नचिन्ह

Next
ठळक मुद्देचोºयांचे प्रमाण वाढले 

[12:43 PM, 10/11/2017] Rajesh Shegokar: अकोला--जिल्ह्याच्या प्रत्येक पोलीस स्टेशन मधील पोलीस कर्मचाऱ्यांना आपल्या पोलीस स्टेशन परिसरात रात्री गस्त घालणे अनिवार्य आहे.
पोलीस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक,पोलीस उपनिरीक्षक व डी. बी.पथकाचे तसेच बिट मधील सर्वच कर्मचारी याना नियमानुसार आलटून पालटून दररोज गस्त घालायची असते.तशी ते घालतातही त्याबद्दल काहीच वाद नाही.परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी शहरातील नंदीपेठ भागात व अकोला रस्त्यावर काही चोऱ्या एकाच रात्री झाल्यामुळे पोलिसांच्या विशेष म्हणजे डी. बी.पथकाच्या रात्रीच्या गस्तीवर शंका यायला लागली आहे.
  चोऱ्या थांबवण्याच्या अथवा होऊच नये याकरिता या पथकाने काहीच उपाय योजना न केल्यामुळे अजूनही चोर बेपत्ताच आहेत.अनेक जुन्या चोरीच्या प्रकरणांचा अजूनही कोणताच तपास या पथकाला लावता आला नाही हे विशेष. मग हे पथक करते तरी काय असाच काहीसा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडण्या आधी पोलीस अधिकाऱ्यांना पडत आहे.चोऱ्यांचा तपास नाही,वरली मटक्याच्या कारवाया नाहीत, जुगारावर पाहिजे तशा कारवाया होताना दिसत नाहीत. हे सत्य आहे .
    आकोट शहर पोलीस स्टेशनला ठाणेदार असताना कैलास नागरे यांनी या डी. बी.पथकाच्या सर्व कर्मचारी याना रात्री गस्त घालण्यासाठी सहा सायकली विकत घेतल्या होत्या. त्या सायकलींवर हे पथकाचे कर्मचारी दररोज शहरात गस्त घालत असत,त्यामुळे शहरातील चोऱ्यांचा प्रकार नाहीसा झाला होता.
 नागरे येथून बदलून जाताच रात्रीची सायकल गस्त बंद करण्यात आली व दहा मिनिटात मोटार सायकलने गावातून गस्त घालुन डी. बी.चे कर्मचारी घरी जाऊन झोपा काढत असल्याचे चित्र आहे. दोन डी
बी. पथके असूनही चोरांवर कोणाचाही वचक राहिलेला नाही हे स्पष्टपणे दिसून येत आहे.
   या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या सायकली आज रोजी पोलीस स्टेशन मधून देखील गायब आहेत. त्यामुळे त्या गेल्या कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
  आकोट शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन शेळके यांनी या सायकलीचा शोध लावून त्यावरून पुन्हा या पथकाच्या कर्मचाऱ्यांची गस्त सुरू करावी . जेणेकरून शहरात रात्रीच्या वेळी होणाऱ्या चोऱ्या व अवैध धंद्यांवर आळा बसेल. तसेच सुस्त पडलेले डी. बी.पथक आळस झटकून कामाला लागेल व शहरात कोठे काय चालले याचा शोध घेऊन कारवाई करणे पोलिसांना सोयीचे होईल.

Web Title: Questioning the police's 'petroling'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.