राजेश्वर मार्गाची दुरवस्था; शिवसेना सरसावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 01:48 PM2017-07-29T13:48:11+5:302017-07-29T13:50:09+5:30

raajaesavara-maaragaacai-dauravasathaa-saivasaenaa-sarasaavalai | राजेश्वर मार्गाची दुरवस्था; शिवसेना सरसावली

राजेश्वर मार्गाची दुरवस्था; शिवसेना सरसावली

Next
ठळक मुद्देजयहिंद चौक ते किल्ला चौक पर्यंतच्या मार्गावर ठिकठिकाणी खड्डेपालखी मार्गावरील पथदिवे बंद

अकोला: श्रावण महिन्यात शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असली तरी मंदिरासमोरील मार्गाची अतिशय दुरवस्था झाल्यामुळे भाविकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. हा प्रकार कमी म्हणून की काय, पालखी मार्गावरील पथदिवे बंद असल्याचा मुद्दा उपस्थित करीत शिवसेना सरसावली असून, यासंदर्भात प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी लावून धरली आहे.
हिंदू धर्मियांचा पवित्र महिना मानला जाणाºया श्रावण महिन्यात शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराच्या दर्शनासाठी मंदिरात भाविकांची गर्दी उसळते. जयहिंद चौक ते किल्ला चौक पर्यंतच्या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, लोखंडी पुलावरील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. श्रावण महिन्यात भाविकांची गर्दी पाहता पावसाळ््यापूर्वीच या रस्त्याची डागडुजी करणे अपेक्षित असताना महापालिका प्रशासनासह सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा मूग गिळून बसणे पसंत करते. यात भरीस भर किल्ला चौक ते जय हिंद चौक ते लोखंडी पुलावरील पथदिवे नादुरुस्त आहेत. राजेश्वर मंदिरात पहाटे ३ वाजतापासून भाविकांची रांग लागते. मुख्य रस्त्यांवर अंधार असल्यामुळे शिवभक्तांना त्रास सहन करावा लागत असल्याचा मुद्दा उपस्थित करीत मनपातील शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा, प्रभागाच्या नगरसेविका मंजूषा शेळके यांनी रस्ता दुरुस्तीच्या संदर्भात तातडीने उपाययोजना करण्याची मागणी लावून धरली आहे.

रस्ता दुरुस्तीसाठी प्रशासनाच्या हालचाली
जयहिंद चौक ते किल्ला चौक रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. सेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी मनपा आयुक्त अजय लहाने, शहर अभियंता इक्बाल खान यांच्यासोबत रस्ता दुरुस्तीसंदर्भात चर्चा केली. त्यावर प्रशासनाने रस्ता दुरुस्तीसाठी हालचाली सुरू केल्या असून, पथदिव्यांच्या संदर्भात विद्युत विभाग प्रमुख अमोल डोईफोडे यांना सूचना देण्यात आल्याची माहिती आहे.

Web Title: raajaesavara-maaragaacai-dauravasathaa-saivasaenaa-sarasaavalai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.