वर्‍हाडातील दीड लाखावर शेतकर्‍यांनी काढला रब्बी पीक विमा

By admin | Published: January 30, 2016 02:20 AM2016-01-30T02:20:56+5:302016-01-30T02:20:56+5:30

सव्वा दोन कोटींवर भरला हप्ता.

Rabbi crop insurance has been collected by farmers on one and a half lakhs of forest land | वर्‍हाडातील दीड लाखावर शेतकर्‍यांनी काढला रब्बी पीक विमा

वर्‍हाडातील दीड लाखावर शेतकर्‍यांनी काढला रब्बी पीक विमा

Next

अकोला: गतवर्षी पावसाने फिरवलेली पाठ आणि रब्बी हंगामातील पिकांची अनिश्‍चितता बघता, यावर्षी पश्‍चिम विदर्भातील (वर्‍हाड) पाच जिल्हय़ातील दीड लाखावर शेतकर्‍यांनी रब्बी पिकांचा विमा उतरवला आहे; परंतु गतवर्षी काढलेल्या रब्बी विम्याची रक्कम अद्याप न मिळाल्याने शेतकर्‍यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे.
पश्‍चिम विदर्भातील अकोला, वाशिम, बुलडाणा, अमरावती आणि यवतमाळ या पाच जिल्हय़ांत यावर्षी ७५ टक्के क्षेत्रावर शेतकर्‍यांनी हरभरा, गहू व इतर रब्बी पिकांची पेरणी केल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. असे असले तरी यावर्षी पिकांची अनिश्‍चितता बघता शेतकर्‍यांनी या पिकांचा विमा उतरवला आहे. कृषी विभागाकडे प्राप्त माहितीनुसार, यामध्ये सर्वाधिक ८८.७२ लाख रुपये विमा हप्ता भरू न अकोला जिल्हय़ातील ३३,१७१ शेतकर्‍यांनी ३४,0७३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा काढला आहे.
बुलडाणा जिल्हय़ातील ५५,८४३ शेतकर्‍यांनी ५४.६३ लाख रुपये हप्ता भरू न २७,३४१ हेक्टर क्षेत्रावरील पिकाचा विमा काढला आहे. वाशिम जिल्हय़ातील ६,८६५ शेतकर्‍यांनी ११.५५ लाख रुपये विमा हप्ता भरू न ५,५६१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा काढला आहे. अमरावती जिल्हय़ातील १८,६२७ शेतकर्‍यांनी २४.६१ लाख रुपये विमा हप्ता भरू न ६१,८0९ हेक्टरवरील पिकांचा विमा काढला असून, यवतमाळ जिल्हय़ातील २६,८७१ शेतकर्‍यांनी ५५.३३ लाख रुपये भरू न पीक विमा काढला आहे.
या पाच जिल्हय़ातील १,४१ ३७७ शेतकर्‍यांनी २,३४.८४ लाख रुपये विमा हप्ता भरू न १,२८,७८४ हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांचा विमा काढला आहे. यात काही बँकांची आकडेवारी येणे शिल्लक असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे.

Web Title: Rabbi crop insurance has been collected by farmers on one and a half lakhs of forest land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.