रब्बीचा हंगाम एक महिना पुढे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 03:36 PM2019-12-03T15:36:33+5:302019-12-03T15:38:08+5:30

गहू, हरभरा पेरणी १५ डिसेंबरपर्यंत करता येणार असल्याचे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Rabbi season a month ahead! | रब्बीचा हंगाम एक महिना पुढे!

रब्बीचा हंगाम एक महिना पुढे!

Next

अकोला: यावर्षी पावसाळा लांबल्याने रब्बी पिके पेरणीचा हंगाम एक महिना पुढे गेला असून,आणखी पेरणी सुरू आहे. गहू, हरभरा पेरणी १५ डिसेंबरपर्यंत करता येणार असल्याचे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
परतीच्या पावसानेही बऱ्यापैकी हजेरी लावल्याने यावर्षी सरासरी गाठली आहे. जिल्ह्यातील सर्वच सिंचन प्रकल्पात मुबलक जलसाठा उपलब्ध असल्याने रब्बीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून, शेतकऱ्यांनीदेखील मूग, उडीद काढणी केलेल्या गहू पिकाचे नियोजन केले आहे. तद्वतच खारपाणपट्ट्यातील शेतकºयांनी रब्बी ज्वारीची पेरणीचे नियोजन केले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यासाठीचे मार्गदर्शन करीत आहेत. सिंचनाच्या सुविधेमुळे गव्हाचे क्षेत्र बºयापैकी वाढण्याची शक्यता आहे; परंतु परतीचा पाऊस लांबल्याने खरीप पिके काढण्यास विलंब झाला आहे. डिसेंबर महिन्यातही खरीप ज्वारी कापणीची कामे सुरू असून, सोयाबीन व इतर पिके काढलेल्या शेतावर मशागतीची कामे सुरू आहेत. शेती तयार करण्यासाठी यंत्राचा वापर करण्यात येत असून, रोटाव्हेटरला सर्वाधिक मागणी आहे. अतिपावसामुळे शेतात डोक्याच्यावर तण वाढले आहे. हे तण काढण्यासाठी अनेक शेतकºयांनी हार्वेस्टरचाही वापर केला आहे.
हरभरा पेरणी सर्वसाधारण नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आाठवड्यापर्यंत तर गहू पिकाची पेरणी १५ डिसेंबरपर्यंत करता येते; परंतु यावर्षी ऋतूचक्र बदलले असून, जमीन ओली आहे. म्हणूनच या दोन्ही पिकांची पेरणी १५ डिसेंबरपर्यंत करता येईल अशी शिफारस केली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गहू पेरणी १५ जानेवारपर्यंत होण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली आहे.


- सिंचनाला पाणी उपलब्ध
काटेपूर्णा, वाण, मोर्णा, निर्गुणा, उमा सर्वच धरणात मुबलक पाणी उपलब्ध असल्याने या धरणांच्या क्षेत्रात येणाºया रब्बी पिकांना पाणी मिळणार आहे. म्हणूनच गव्हाची पेरणी १५ जानेवारीपर्यंत होण्याची शक्यता आहे. काही भागात कोरडवाहू क्षेत्रावरही शेतकºयांनी गहू पेरणी केली आहे.


- अकोला तालुक्यात पेरणीला उशीर
अकोला तालुक्यात पेरणी आता पेरणी केली जात असून, शेतकºयांनी हरभरा पेरणीवर भर दिला आहे. बोंदरखेड, यावलखडे, सांगळूद, पांढरी आदी गावांच्या क्षेत्रात पेरणी सुरू आहे.


- पावसाळा लांबल्याने रब्बी पेरणीचा हंगाम एक महिना पुढे ढकलला आहे. गहू, हरभरा पेरणी १५ नोव्हेंबरपर्यंत केली जाते. यावर्षी पावसाळा लांबल्याने ही दोन्ही पिकांची १५ डिसेंबरपर्यंत पेरणी करता येईल, अशी शिफारस करण्यात आली आहे. तथापि, उशिरा पेरणी करण्यात येणाºया शेतकºयांकडे सिंचन व्यवस्था असली तर उत्तमच.
डॉ.एन.आर. पोटदुखे,
विभागप्रमुख,
कडधान्य विभाग,
डॉ. पंजबाराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

 

Web Title: Rabbi season a month ahead!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.