रब्बी हंगामातील हरभऱ्याची वाढ खुंटली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 12:09 PM2020-01-13T12:09:55+5:302020-01-13T12:10:07+5:30

पिकाची वाढ होण्यासाठी शेतकºयांनी विविध टॉनिक फवारणीचा प्रयत्न सुरू केल्याने त्यांचा खर्चही वाढला आहे.

Rabbi season's greenery grows! |  रब्बी हंगामातील हरभऱ्याची वाढ खुंटली!

 रब्बी हंगामातील हरभऱ्याची वाढ खुंटली!

googlenewsNext

अकोला : शेतकºयांनी यावर्षी उशिरा पेरणी केलेल्या रब्बी हंगामातील हरभºयांची वाढ खुंटल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. या पिकाची वाढ होण्यासाठी शेतकºयांनी विविध टॉनिक फवारणीचा प्रयत्न सुरू केल्याने त्यांचा खर्चही वाढला आहे.
गतवर्षी पाऊस नोव्हेंबर महिन्यापर्यंत सुरू होता. शेतकºयांना शेतीची कोणतीच कामे करता न आल्याने शेतात प्रचंड तण वाढले होते. पाऊस गेल्यानंतर वापसा येण्यासाठी शेतकºयांना प्रतीक्षा करावी लागली. हरभरा पेरणी ही आॅक्टोबर व नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात करणे अपेक्षित असते. तथापि, यावर्षी डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत शेतकºयांनी पेरणी केली. म्हणजेच रब्बी पेरणीचा हंगाम एक महिना पुढे गेला. गहू पेरणी तर आणखी सुरू आहे; परंतु उशिरा केलेल्या पेरणीमुळे अनेक भागातील हरभरा पिकाची वाढ झाली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पीक वाढीसाठी शेतकरी या पिकावर विविध प्रकारची औषध (टॉनिक) फवारणी करीत आहे. काही भागात हरभरा पीक पिवळे पडत असल्याने बुरशीनाशक फवारणी करण्यात येत आहे. हरभºयाचे झाड वाढावीत, यासाठीचे विविध प्रयत्न करीत असताना घाटेअळीने तोंड वर काढले आहे. या अळीच्या व्यवस्थापनासाठी कीटकनाशकांची फवारणीही शेतकºयांना करावी लागत आहे.
विदर्भात खरीप हंगामातील सोयाबीन, ज्वारी, मूग व उडीद ही नगदी पिके काढल्यानंतर शेतकरी गहू, हरभरा पिकांची पेरणी करतात. ज्यांच्याकडे संरक्षित सिंचनाची व्यवस्था आहे. त्या ठिकाणी शेतकरी गहू पेरणी करतात. हरभरा सहसा कोरडवाहूच घेतला जात; परंतु यावर्षी पेरण्यांना उशीर झाल्याने हरभºयाच्या झाडांची अपेक्षित वाढ झाली नसल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी तर अगदी लहान झाडांना फुलोरा आला आहे. याचा परिणाम पीक उत्पादनावर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

Web Title: Rabbi season's greenery grows!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.