वऱ्हाडात ४५ टक्के क्षेत्रावर रब्बी पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 06:07 PM2018-11-19T18:07:36+5:302018-11-19T18:07:38+5:30
अकोला : यावर्षीच्या पावसाच्या अनिश्चिततेचा परिणाम खरिपासह रब्बी हंगामावर झाला असून, पेरणीची गती खुंटली आहे.आजमितीस पश्चिम विदर्भात (वऱ्हाड) आतापर्यंत विविध पिकांची केवळ ४५ टक्क्यांवर पेरणी झाली आहे.
अकोला : यावर्षीच्या पावसाच्या अनिश्चिततेचा परिणाम खरिपासह रब्बी हंगामावर झाला असून, पेरणीची गती खुंटली आहे.आजमितीस पश्चिम विदर्भात (वऱ्हाड) आतापर्यंत विविध पिकांची केवळ ४५ टक्क्यांवर पेरणी झाली आहे. राज्यातील चित्र असेच आहे. राज्यात आतापर्यंत ५ लाख हेक्टरपर्यंतच रब्बीतील कडधान्याची पेरणी झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे अर्धेच क्षेत्र आहे.
राज्यात रबी पिकांचे सरासरी क्षेत्र ५६.९३ लाख हेक्टर आहे. तर पश्चिम विदर्भातील अकोला,बुलडाणा,वाशिम,यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यातील रब्बीचे सरासरी क्षेत्र ६ लाख ४६ हजार ७६४ हेक्टर आहे. यावर्षी आतापर्यंत केवळ २ लाख ८८ हजार ३६१ हेक्टर म्हणजेच ४५ टक्के रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. यात २ लाख ५० हजार २५४ हेक्टरवर हरभरा पेरणी झाली आहे. राज्यात राज्यातही हेच चित्र आहे.
यावर्षी कमी पाऊस झाल्याने जमिनीत पूरेसा ओलावा नाही,बहुतांश ठिकाणी जमिनाला आतापासूनच भेगा पडल्या आहेत परिणामी रब्बी पेरणीवर परिणाम झाला आहे. वºहाडात आतापर्यंत ८० टक्केच्यावर पेरणी अपेक्षित होती तथापि यावर्षी ५५ टक्के रब्बीचे क्षेत्र पेरणीविना आहे. दरम्यान, जेथे संरक्षीत ओलीताची सोय आहे तेथील शेतकऱ्यांनी रब्बी गहू,हरभरा पेरणी केली आहे. जेथे ओलीताची व्यवस्था नाही तेथील शेतकºयांनी धाडस करू न रब्बी पेरणी केली पण ओलावा नसल्याने बºयाच ठिकाणी हरभºयावर परिणाम झाला आहे.
राज्यात मागच्या २ नोव्हेंबरपर्यंत १३ टक्के पेरणी झाली होती.पेरण्यांची गती संथ असल्याने आतापर्यंत यात तेवढी गती आली नसल्याने यावर्षी रब्बीचे क्षेत्र मोठ्याप्रमाणात कोरडे राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गतवर्षी राज्यात आतापर्यंत १० लाख हेक्टरवर रब्बीतील कडधान्य पिकांची पेरणी झाली होती. यावर्षी हे क्षेत्र अर्धेच आहे.