वाशिम जिल्ह्यात आॅक्टोबर अखेर ६.५ हजार हेक्टरवर रब्बी पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 01:27 PM2018-10-27T13:27:18+5:302018-10-27T13:27:42+5:30
वाशिम: रब्बीच्या पेरणीला जिल्ह्यात सुरुवात झाली असली तरी, आॅक्टोबर अखेर केवळ ६४८४ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: रब्बीच्या पेरणीला जिल्ह्यात सुरुवात झाली असली तरी, आॅक्टोबर अखेर केवळ ६४८४ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. भारनियमनामुळे शेतकºयांना सिंचन करणे कठीण होत असल्याने यंदा रब्बीचे क्षेत्र घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात सरासरी ९२९९६ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी होते. त्यात यंदा पाऊस समाधानकारक झाला. त्यामुळे जलस्त्रोतात पुरेसा साठा असल्याने रब्बीच्या क्षेत्रात थोडीबहुत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती; परंतु ऐन रब्बीच्या तोंडावर भारनियमन सुरू करण्यात आले. त्यामुळे वीज पुरवठ्याअभावी शेतकºयांना पेरणीसाठी जमीन ओली करणेही कठीण झाले. याच कारणामुळे आॅक्टोबर महिना संपत आला तरी, जिल्ह्यात केवळ ६४८४ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. त्यातही गहू पिकाला पाण्याची अधिक गरज असते. त्यामुळे शेतकºयांनी या पिकाकडे पाठ फिरवत हरभरा पेरणीवर भर दिल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात सरासरी २८ हजार हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी अपेक्षीत असताना सद्यस्थिती केवळ ४३७ हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली आहे. अर्थात अद्याप गव्हाच्या पेरणीसाठी आणखी बराच कालावधी आहे; परंतु पुढेही भारनियमन आणि वातावरणातील बदलामुळे सरासरी क्षेत्राच्या ५० टक्के पेरणीही होण्याची शक्यता नाही. जिल्ह्यात ६२ हजार ३९२ हेक्टर क्षेत्रावर हरभºयाची पेरणी अपेक्षीत असताना सद्यस्थितीत केवळ ६०१९ हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली आहे.
तृणधान्य, गळीताकडे शेतकºयांची पाठ
जिल्ह्यात रब्बी ज्वारी, मका आदि पिकांसह इतर तृणधान्याची सरासरी १ हजार ६६७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षीत असताना अद्याप एकाही हेक्टरवर तृणधान्याची पेरणी झाली आहे. त्यातच जिल्ह्यात रब्बी गळीताचे क्षेत्र ४१४ हेक्टर अपेक्षीत असताना केवळ २६ हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली आहे. यावरून शेतकºयांनी तृणधान्य आणि गळीताकडेही पाठ केल्याचे दिसत आहे.