यावर्षी रब्बीचा पेरा वाढणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 08:57 AM2019-10-12T08:57:01+5:302019-10-12T08:57:06+5:30

विदर्भातील पाच जिल्ह्यांसाठी ८० हजार क्ंिवटल हरभरा बियाण्यांचे नियोजन केले आहे. हरभºयाच्या काही बियाण्यांवर अनुदानही दिले जाणार आहे.

 Rabbi sowing will increase this year! | यावर्षी रब्बीचा पेरा वाढणार!

यावर्षी रब्बीचा पेरा वाढणार!

Next

अकोला : विदर्भात यावर्षी रब्बी हंगामात पिकांचा पेरा वाढणार आहे. त्यासाठीच्या बियाण्याची शेतकऱ्यांकडून मागणी वाढली असून, महाराष्टÑ बियाणे (महाबीज) महामंडळाने पश्चिम (वºहाड) विदर्भातील पाच जिल्ह्यांसाठी ८० हजार क्ंिवटल हरभरा बियाण्यांचे नियोजन केले आहे. हरभºयाच्या काही बियाण्यांवर अनुदानही दिले जाणार आहे.
यावर्षी वºहाडात पावसाला उशिरा सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. तथापि, जुलैनंतर आलेल्या पावसाने तारले. जुलै महिन्यापासून जोरदार नसला तरी सतत तुरळक, मध्यम स्वरू पाचा पाऊस सुरू आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी सरासरी गाठली आहे. म्हणूनच यावर्षी रब्बी पिकांची पेरणी वाढणार असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. याच अनुषंगाने महाबीजनेही रब्बी हंगामासाठी लागणाºया बियाण्याची तजवीज केली आहे. वºहाडातील अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांसाठी ७८ हजार क्ंिवटल हरभरा बियाण्याचे नियोजन करण्यात आले असून, लवकरच बाजारात उपलब्ध केले जाणार आहे. तसेच गव्हाचे २४ हजार क्विंटल बियाणेदेखील उपलब्ध करू न दिले जाणार आहे.
हरभरा बियाण्यांवर यावर्षीही प्रतिकिलो ३५ रुपये अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी सुरुवातीला राजविजय २०२, २०३ तसेच फुले व विक्रम या हरभºयांच्या जातीचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. इतर प्रचलित वाणांवर अनुदान देण्यासाठीच्या अद्याप महाबीजला सूचना प्राप्त झालेल्या नाहीत.


- परमिट कोण वितरित करणार?
अनुदानावारील बियाणे वितरित करण्यासाठी शेतकºयांना परमिट वितरित केले जाते. कृषी विभागामार्फत हे परमिट शेतकºयांना दिले जाते; परंतु गतवर्षीपासून कृषी विभागाने ही जबाबदारी घेण्यास नकार दिल्याने शेतकºयांची धावपळ झाली. शेवटी महाबीजला परमिट वितरणाची जबाबदारी घ्यावी लागली. यावर्षी कृषी विभागाने परमिट वितरण करावे, यासाठीची कृषी विभागाच्या अधिकाºयासोबत शनिवारी बैठक पार पडली.

वºहाडात यावर्षी रब्बी हंगामातील पेरा वाढण्याची शक्यता बघता, हरभरा, गहू बियाण्यांची तजवीज करण्यात आली आहे. अनुदानावरील काही हरभरा बियाण्याचा यामध्ये समावेश आहे. परमिट वितरणासंदर्भात कृषी विभागासोबत सकारात्मक बैठक पार पडली.
- बी. डी. लुले,
विभागीय व्यवस्थापक,
महाबीज, अकोला.

 

Web Title:  Rabbi sowing will increase this year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.