३२ टक्के पीक कर्ज वाटपावरच गुंडाळला रब्बी हंगाम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 12:25 PM2019-03-08T12:25:26+5:302019-03-08T12:25:56+5:30
जिल्ह्यातील केवळ २ हजार २०० शेतकऱ्यांना २३ कोटी ६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. त्यामुळे ३२.८१ टक्के पीक कर्ज वाटपावरच यावर्षीचा रब्बी हंगाम गुंडाळण्यात आल्याचे वास्तव आहे.
अकोला: जिल्ह्यात यावर्षीच्या रब्बी हंगामात ७० कोटी २९ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे; मात्र रब्बी हंगाम संपला असला, तरी उद्दिष्टाच्या तुलनेत फेबु्रवारी अखेरपर्यंत जिल्ह्यातील केवळ २ हजार २०० शेतकऱ्यांना २३ कोटी ६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. त्यामुळे ३२.८१ टक्के पीक कर्ज वाटपावरच यावर्षीचा रब्बी हंगाम गुंडाळण्यात आल्याचे वास्तव आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ७० कोटी २८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. त्यानुषंगाने गत आॅक्टोबरपासून जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांसह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत शेतकरी रब्बी पीक कर्ज वाटपाचे काम सुरू करण्यात आले. जिल्ह्यातील रब्बी हंगाम संपला असताना, रब्बी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट लक्षात घेता, त्या तुलनेत २८ फेबु्रवारीपर्यंत जिल्ह्यातील केवळ २ हजार २०० शेतकºयांना २३ कोटी ६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आणि त्या तुलनेत बँकांमार्फत प्रत्यक्षात करण्यात आलेले कर्ज वाटपाचे प्रमाण विचारात घेता, दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यात ३२.८१ टक्के पीक कर्ज वाटपावरच रब्बी हंगाम गुंडाळण्यात आल्याचे वास्तव समोर येत आहे.
रब्बी पीक कर्ज वाटपाचे असे आहे वास्तव!
- -कर्ज वाटपाचे उद्दिष्ट : ७० कोटी २८ लाख रुपये.
- -२८ फेबु्रवारीपर्यंत कर्ज वाटप : २३ कोटी ०६ लाख रुपये.
- -कर्जाचा लाभ मिळणारे शेतकरी : २ हजार २००
- -कर्ज वाटपाची टक्केवारी : ३२.८१ टक्के .
यावर्षीच्या रब्बी हंगामात जिल्ह्यात ७० कोटी २८ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी आतापर्यंत २२०० शेतकºयांना २३ कोटी ६ लाख रुपये (३२.८१ टक्के) पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे.
- जी. जी. मावळे,
जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)