१.४0 लाख हेक्टरवर रब्बी पेरणीचे नियोजन

By admin | Published: October 12, 2015 01:56 AM2015-10-12T01:56:40+5:302015-10-12T01:56:40+5:30

४५ हजार क्विंटल बियाण्याची मागणी.

Rabi sowing planning on 1.40 lakh hectare | १.४0 लाख हेक्टरवर रब्बी पेरणीचे नियोजन

१.४0 लाख हेक्टरवर रब्बी पेरणीचे नियोजन

Next


अकोला: जिल्ह्यात यावर्षीच्या रब्बी हंगामात १ लाख ४0 हजार ३00 हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणीचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. रब्बी पेरणीसाठी ४५ हजार ३१६ क्विंटल बियाण्यांची मागणी कृषी आयुक्तालयाकडे करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील रब्बी पेरणीची सरासरी १ लाख ७ हजार १५६ हेक्टर एवढी आहे.
सरासरीच्या तुलनेत यावर्षीच्या रब्बी हंगामात जिल्ह्यातील अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, तेल्हारा, पातूर व मूर्तिजापूर या सातही तालुक्यात १ लाख ४0 हजार ३00 हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणीचे नियोजन जिल्हा कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
त्यामध्ये गहू, हरभरा, करडी, मका व सूर्यफूल इत्यादी पीक पेरणीच्या क्षेत्राचा समावेश आहे. रब्बी हंगामात पेरणीसाठी ४५ हजार ३१६ क्विंटल बियाण्याची मागणी जिल्हा कृषी विभागामार्फत राज्याच्या कृषी आयुक्तालयाकडे करण्यात आली आहे.

दहा हजार क्विंटल बियाण्याचा पुरवठा!
ल्ल रब्बी हंगामात जिल्ह्यातील पेरणीसाठी ४५ हजार ३१६ क्विंटल बियाण्याची मागणी कृषी आयुक्तालयाकडे करण्यात आली आहे. त्यापैकी ९ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात १0 हजार २५१ क्विंटल बियाण्याचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यामध्ये रब्बी ज्वारी ५0 क्विंटल, गहू ५३0 क्विंटल, हरभरा ९ हजार ४७१ िक्वंटल, करडई १८५ क्विंटल व सूर्यफूल १५ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे.

१२ हजार मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध!
रब्बी हंगामासाठी कृषी विभागामार्फत ७४ हजार ७00 मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली आहे. त्यापैकी ९ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात १२ हजार ६७२ मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध झाला आहे. त्यामध्ये युरिया ९३७ मेट्रिक टन, डीएपी १ हजार ५२३ मेट्रिक टन, एमओपी २ हजार ४0९ मेट्रिक टन,एसएसपी ७00 मेट्रिक टन, संयुक्त खते ६ हजार ६६३ मेट्रिक टन व मिश्र खते १५४ मेट्रिक टन ख तसाठय़ाचा समावेश आहे.

 

Web Title: Rabi sowing planning on 1.40 lakh hectare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.