रब्बीत हरभर्‍याचे क्षेत्र वाढणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 08:17 PM2017-10-10T20:17:12+5:302017-10-10T20:18:29+5:30

अकोला : नैऋत्य मोसमी पाऊस विदर्भात जेमतेम झाला; पण रब्बी हंगामाच्या तोंडावर ईशान्य पावसाने बर्‍यापैकी हजेरी लावल्याने यावर्षी रब्बी हंगामात हरभरा पिकाची पेरणी वाढणार असल्याने महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज)  रब्बी हंगामातील बियाणे बाजारात उपलब्ध करण्यास सुरुवात केली असून, यावर्षी दोन लाख १३ हजार क्विंटल बियाणे बाजारात आणण्यात येईल. यातील १ लाख ७0 हजार क्विंटल बियाण्यांना अनुदान दिले जाणार आहे.

Rabibit will grow every field! | रब्बीत हरभर्‍याचे क्षेत्र वाढणार!

रब्बीत हरभर्‍याचे क्षेत्र वाढणार!

Next
ठळक मुद्देईशान्य पाऊस पोषकमहाबीजने केले २ लाख १३ हजार क्विंटलचे नियोजनअनुदान मिळणार 

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : नैऋत्य मोसमी पाऊस विदर्भात जेमतेम झाला; पण रब्बी हंगामाच्या तोंडावर ईशान्य पावसाने बर्‍यापैकी हजेरी लावल्याने यावर्षी रब्बी हंगामात हरभरा पिकाची पेरणी वाढणार असल्याने महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज)  रब्बी हंगामातील बियाणे बाजारात उपलब्ध करण्यास सुरुवात केली असून, यावर्षी दोन लाख १३ हजार क्विंटल बियाणे बाजारात आणण्यात येईल. यातील १ लाख ७0 हजार क्विंटल बियाण्यांना अनुदान दिले जाणार आहे.
राज्यात सलग तीन ते चार वर्षांपासून पावसाची अनिश्‍चितता असल्याने शेतकर्‍यांना रब्बी हंगामातील पिके हव्या त्या प्रमाणात घेता आली नाहीत; पण यावर्षी शेवटी काही भागात चांगला पाऊस होत असून, ईशान्य पाऊस होत आहे. नैऋत्य मोसमी पाऊस १५ ऑक्टोबरनंतर परतीच्या प्रवासाला निघण्याची शक्यता कृषी हवामानशास्त्र विभागाकडून वर्तविली जात आहे. त्यामुळे विदर्भासह राज्यात हरभर्‍याचे क्षेत्र वाढणार असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. त्यानुषंगाने महाबीजने राज्यासाठी २ लाख १३ हजार क्विंटल हरभरा बियाणे उपलब्ध केले असून,  यामध्ये १ लाख ७0 हजार क्विंटल बियाणे शेतकर्‍यांना अनुदानावर उपलब्ध केले जाणार आहे. तसेच १५ वर्षांआतील या जातींना अनुदान दिले जाणार आहे, तर १५ वर्षांवरील ४३ हजार क्विंटल हरभर्‍याला अनुदान दिले जाणार नाही. काही हरभर्‍यामध्ये ज्ॉकी आणि दिग्विजय या जातींना अनुदान दिले जाणार आहे.

रब्बी हंगामासाठी २ लाख १३ हजार क्विंटल हरभर्‍याचे बियाणे राज्यासाठी उपलब्ध करण्यात आले आहे. यातील १५ वर्षांआतील १ लाख ७0 हजार क्विंटल बियाण्यांना अनुदान दिले जाणार असून, १५ वर्षांवरील ४३ हजार क्विंटल वाणाला अनुदान मिळणार नाही. बियाणे बाजारात उपलब्ध करण्यास सुरुवात झाली.
- रामचंद्र नाके,
महाव्यवस्थापक (विपणन), महाबीज, अकोला.

Web Title: Rabibit will grow every field!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.