दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र बनविणारे रॅकेट सक्रिय; बनावट प्रमाणपत्राच्या आधारे नोकऱ्यांवर डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 12:36 PM2018-10-16T12:36:26+5:302018-10-16T12:39:42+5:30

अकोला: अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातून दिव्यांगत्वाचे बनावट प्रमाणपत्र तयार करणारे रॅकेट सक्रिय असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे

a racket that creates a disability Certificate in Akola | दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र बनविणारे रॅकेट सक्रिय; बनावट प्रमाणपत्राच्या आधारे नोकऱ्यांवर डल्ला

दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र बनविणारे रॅकेट सक्रिय; बनावट प्रमाणपत्राच्या आधारे नोकऱ्यांवर डल्ला

Next
ठळक मुद्दे बनावट प्रमाणपत्र बनविण्यात येत असल्याचे विधी व न्याय मंत्रालयाच्या सहायक विधी सल्लागार प्रकरणानंतर समोर आले आहे.बाहेरील व्यक्तींसोबतच वैद्यकीय महाविद्यालयातील अंतर्गत यंत्रणेची मिलीभगत असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.

- सचिन राऊत

अकोला: अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातून दिव्यांगत्वाचे बनावट प्रमाणपत्र तयार करणारे रॅकेट सक्रिय असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आलेल्या खºया दिव्यांगत्व प्रमाणपत्रावरून बनावट प्रमाणपत्र बनविण्यात येत असल्याचे विधी व न्याय मंत्रालयाच्या सहायक विधी सल्लागार प्रकरणानंतर समोर आले आहे. यामध्ये बाहेरील व्यक्तींसोबतच वैद्यकीय महाविद्यालयातील अंतर्गत यंत्रणेची मिलीभगत असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज केल्यानंतर शारीरिक दिव्यांगत्व असलेल्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना हे प्रमाणपत्र दिव्यांगत्व असलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात देण्यात येते. त्यानंतर सदरचे खरे प्रमाणपत्र खरे दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तीला दिल्यानंतर याच प्रमाणपत्राच्या आधारे त्यावरील नाव बदलून तसेच छायाचित्र संबंधित व्यक्तीचे लावून बनावट दिव्यांगत्व प्रमाणपत्र तयार करण्यात येत आहे. या दिव्यांगत्व प्रमाणपत्रावर मंत्रालयापासून ते शिक्षक, आदिवासी विभाग, महसूल विभाग, बँकांमध्ये नोकºया मिळविण्यात येत आहे. त्यामुळे दिव्यांगासाठी राखीव असलेल्या जागांवर बनावट प्रमाणपत्राच्या आधारे नोकºया मिळविणाºयांची मोठी संख्या असून, त्यांनी दिव्यांगत्वाच्या नोकºयांवर डल्ला मारला. यासाठी राज्य स्तरावरच एक रॅकेट सक्रिय असून, या रॅकेटला मोडीत काढण्यात यंत्रणेच्या उपाययोजनाही सपशेल अपयशी ठरल्या आहेत.

आदिवासींचे प्रमाणपत्र औरंगाबादमधून
आदिवासींच्या विविध योजनांचा तसेच त्यांच्यासाठी राखीव असलेल्या नोकºयांवर डल्ला मारण्यासाठी औरंगाबाद येथून बनावट प्रमाणपत्र मिळत असल्याचेही सूत्रांकडून समोर आले आहे. यासाठी राज्य स्तरावरील एक मोठे रॅकेट कार्यरत असून, या रॅकेटच्या माध्यमातून आदिवासी समाजाचे असल्याचे प्रमाणपत्र, दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र एक ते दोन लाख रुपयांमध्ये सहज उपलब्ध करण्यात येत असल्याची माहिती आहे.

दोन प्रमाणपत्रांमध्ये तफावत
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातून देण्यात आलेल्या दिव्यांगत्व प्रमाणपत्रावर खोडतोड करणारी एक यंत्रणाच कार्यरत आहे. एखाद्या व्यक्तीला ७० टक्के दिव्यांगत्व असताना त्याला खरे प्रमाणपत्र दिल्यानंतर याच प्रमाणपत्रावर दुसरे छायाचित्र लावून बनावट दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र बनविण्यात येते. छायाचित्र आणि नाव बदलून दुसºयाच व्यक्तीच्या नावाने दिव्यांगत्व प्रमाणपत्र तयार करण्यात येत असून, या आधारे शासकीय नोकºया मिळविण्यात येत आहेत. दोन प्रमाणपत्रांमध्ये याच कारणावरून तफावत आढळत असून, वैद्यकीय यंत्रणाही यामुळे अडचणीत आली आहे.
 

 

Web Title: a racket that creates a disability Certificate in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.