विकास निधी वाटपावरून भाजपच्या दोन नगरसेवकांमध्ये राडा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:14 AM2021-06-19T04:14:09+5:302021-06-19T04:14:09+5:30
कारणीभूत असल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी दाखल पोलिसांनी परिसरातून चाकू, पाइप व मिरचीपूड जप्त केल्याची माहिती आहे. नगर परिषदेला १५ ...
कारणीभूत असल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी दाखल पोलिसांनी परिसरातून चाकू, पाइप व मिरचीपूड जप्त केल्याची माहिती आहे.
नगर परिषदेला १५ व्या वित्त आयोगातून अंदाजे पाच कोटींच्यावर निधी मंजूर झाला आहे. विविध प्रभागांतील विकासासाठी ५० टक्के निधीची कामे प्रस्तावित करायची होती. या निधीमध्ये कामाचे प्रस्ताव टाकण्यावरून ३-४ दिवसांपासून नगरसेवकांमध्ये धुसफूस सुरू आहे. दरम्यान, १८ जून रोजी काम प्रस्तावित करण्याच्या वादाला तोंड फुटले. नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे यांच्या कक्षात भाजपचे नगरसेवक मंगेश लोणकर व मंगेश चिखले यांचे काम प्रस्तावित करण्यावरून वादावादी होऊन धक्काबुक्की झाली. नगराध्यक्ष कक्षात तिखट मिरचीपूड पसरली होती. यावेळी उपस्थितांनी आवराआवर केली. तर, पोलिसांना घटनेची माहिती मिळताच राज्य राखीव दलाची तुकडी घटनास्थळी पोहोचली. या घटनेनंतर पोलिसांनी परिसरातून लोखंडी पाइप व चाकू जप्त केला. घटनेच्या माहितीवरून दोन्ही नगरसेवकांचे समर्थक नगर परिषद परिसरात जमा झाले होते. राज्य राखीव दलाच्या जवानांनी जमावाला पांगविले. नगराध्यक्ष कक्षात बराच वेळ गोंधळ सुरू होता.
सर्व प्रकार सीसी कॅमेऱ्यात कैद
नगर परिषदेत घडलेला सर्व प्रकार सीसी कॅमे-यात कैद झाला. ही शस्त्रे पालिकेमध्ये कोणी आणली, याचा शोध पोलीस घेत आहे. यासंदर्भात वृत्त लिहीपर्यंत तक्रार दाखल झाली नव्हती.
सत्ताधारी नगरसेवकांमध्ये प्रचंड वाद
अकोट पालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. विरोधी पक्षांपेक्षा विकासनिधीच्या वाटपावरून सत्ताधारी नगरसेवकांमध्ये आपापसात प्रचंड वाद असून यावर्षी नगर परिषदेचे निवडणूक होण्याची शक्यता असल्याने विकासकामे पूर्ण करण्यासाठी मारामार सुरू झाली आहे. यापूर्वीसुद्धा नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे व नगरसेवक पती यांच्यामध्ये मारहाणीची घटना घडली आहे. त्यामुळे विकास निधीमागील हेतू सफल होण्यासाठी भाजप पक्षश्रेष्ठींनी वाटाघाटीकरिता दखल देणे गरजेचे झाले आहे.