ग्रामसभेत राडा; दिग्गजांसह १६ जणांवर गुन्हा

By admin | Published: January 27, 2016 11:30 PM2016-01-27T23:30:05+5:302016-01-27T23:30:05+5:30

माजी सभापती व मनसे जिल्हाध्यक्षांवर गुन्हा; शिरपूर ग्रामपंचायत सदस्यास मारहाण.

Rada in Gramsabha; 16 people including veterans | ग्रामसभेत राडा; दिग्गजांसह १६ जणांवर गुन्हा

ग्रामसभेत राडा; दिग्गजांसह १६ जणांवर गुन्हा

Next

शिरपूर जैन (जि. वाशिम): प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित शिरपूर येथील ग्रामसभेत विरोधी गटाच्या सदस्यांचे नाव घेणे टाळल्याने दोन गटात वाद झाला. वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले. परस्परविरोधी तक्रारीहून माजी जिल्हा परिषद सभापती व मनसे जिल्हाध्यक्षांसह एकूण १६ जणांविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. येथील ग्राम पंचायत कार्यालयाच्या प्रांगणात २६ जानेवारी रोजी निमित्त ग्रामसभा आयोजित केली होती. सकाळी ८.३0 वाजता समस्त गावकर्‍यांच्या उपस्थितीत शिरपूर ग्राम पंचायतमध्ये झेंडा वंदनाचा कार्यक्रम झाल्यानंतर १0 वाजता ग्रामसभेला सुरूवात झाली. सभा सुरु होण्यापूर्वी ग्रामपंचायतच्या वतीने उपस्थितांचे नाव घेणे सुरू असताना, विरुध्द गटाच्या सदस्यांचे नाव घेण्याचे टाळले. या विषयी विरुध्द गटाचे सदस्य रामा गुडदे यांनी विचारले असता त्यास तु नेहमीच अनावश्यक प्रश्न निर्माण करतो, असे म्हणून वाद घातला. वाद विकोपाला गेल्याने मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रारी गुडदे यांने पोलिसात दिली. त्यांच्या तक्रारीवरुन जि. प. माजी सभापती डॉ.श्याम गाभणे, सरपंच पती गजानन ईरतकर, रामेश्‍वर ईरतकर, प्रकाश ईरतकर, सुभाष ईरतकर, गोपाल मोरे, योगेश वानखेडे यांच्या विरुध्द कलम १४३, १४७, २९४, ३२३, ५0४, ५0६ नूसार गुन्हा दाखल करण्यात आला. दुसर्‍या गटाकडून सरपंच इंदूताई ईरतकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, सभेपूर्वी कोरमच्या स्वाक्षरी घेण्याचे काम सुरु असताना रामा गुडदे यांनी गैरकायद्याची मंडळी आणून अडथळा निर्माण केला आणि अलि शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. सरपंच ईरतकर यांच्या तक्रारीवरुन मनसे जिल्हाध्यक्ष (पश्‍चिम) अशोक अंभोरे, विजय अंभोरे, गणेश अंभोरे, रामा गुडदे, संजय गौर, रवी पूरी, संजय भालेराव, किशोर इंगळे यांच्या विरुध्द भादंवी कलम १४३, २९४, २८८, ५0६ गुन्हा दाखल केला. परस्परविरूद्ध तक्रारीवरुन १६ जाणंविरुध्द गुन्हा दाखल केला.

Web Title: Rada in Gramsabha; 16 people including veterans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.