तेल्हा-यात कडकडीत बंद!
By admin | Published: July 5, 2017 07:45 PM2017-07-05T19:45:41+5:302017-07-05T20:15:24+5:30
लघु व्यावसायिकांची कायम पर्यायी व्यवस्थेची मागणी; चोख पोलीस बंदोबस्त
तेल्हारा : गेल्या ३० ते ४० वर्षापासून लघु व्यवसाय करीत असलेल्या शहरातील लघु व्यावसायिकांना कायम पर्यायी जागा नगर परिषदेने उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी ५ जुलै रोजी बंदचे आवाहन केले होते. या बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासून शहरातील सर्वच व्यापारपेठा संध्याकाळपर्यंत दिवसभर बंद होत्या. दरम्यान शहरात शांतता होती.यावेळी पोलीस बंदोबस्त चोख होता.
शहरातील हद्दीमध्ये लघु व्यावसायिक मोठ्या प्रमाणात आहेत. नगर पालिका प्रशासनाने या व्यावसायिकांना कायमस्वरूपी जागा देऊन अतिक्रमणाबाबत पाठविलेल्या नोटीस पावसाळा पाहता सहानुभूतीने विचार करावा. या व्यवसायवर कित्येक कुटूंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. करिता ५ जुलै रोजी शहरातील टपरीधारक व नागरिकांकडून बंद पुकारण्यात आला. या बंदला सकाळपासून चांगला प्रतिसाद मिळाला. दिवसभर शहरातील लहान मोठ्या व्यावसायिकांनी आपले प्रतिष्ठान बंद ठेवली. पुकारलेल्या बंदकरिता माजी नगराध्यक्ष दयालसिंह बलोदे, सुनील पालीवाल, राजेश वानखडे, अॅड. पवन शर्मा, चंद्रकांत मोरे, दयाराम विरघट, शे. अहमद, राम पाऊलझगडे, विनायक फोकमारे, राजेश आसरे, विजय मुजांळे, रामभाऊ फाटकर, विक्रांत शिंदे, लक्ष्मण मानकर इत्यादींसह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शविला.