बडया जुगारावर छापा;१५ जुगारी अटकेत, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 12:27 PM2020-06-28T12:27:10+5:302020-06-28T12:27:15+5:30

१५ जुगारींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Raid on big gamblers; 15 gamblers arrested, property worth Rs 6 lakh confiscated | बडया जुगारावर छापा;१५ जुगारी अटकेत, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

बडया जुगारावर छापा;१५ जुगारी अटकेत, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

Next

अकोला : रामदास पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नाजुक नगरात खुलेआम सुुरु असलेल्या मोठया जुगार अड्डयावर जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमूख मिलींदकुमार बहाकर व त्यांच्या पथकाने शनिवारी रात्री उशीरा छापा टाकला. या जुगार अड्डयावरुन १५ जुगारींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष पथकाने केलेल्या या कारवाईमुळे रामदास पेठ पोलिसांचे अर्थकारण उघड झाले असून येथील डीबी पथक संशयाच्या घेऱ्यात सापडले आहे.
नाजूक नगर येथील दाट लोकसंख्या असलेल्या वस्तीत जुगार अड्डा सुरु असुन या अड्डयावर नागरिकांची मोठया प्रमाणात गर्दी असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमूख मिलींदकु मार बहाकर यांना मिळाली. या माहितीवरुन पथकाने सापळा रचून जुगारावर छापा टाकल्यानंतर अजहररूद्दीन हफिजोद्दीन वय २२ वर्ष रा.मोहता मिल जवळ नाजुक नगर, मोहम्मद रेहाण मोहम्मद लुकमान वय २० वर्ष रा.ताज चौक अकोट फाईल, अयाज खा दाउद खान वय ३५ वर्ष रा.नया बैदपुरा अरबी मदरसा जवळ, अयाज अहेमद अब्दुल अमीर वय २२ वर्ष रा. नया बैदपुरा अरबी मदरसा जवळ, जिशान खान दाउदखान वय २१ वर्ष रा. नया बैदपुरा, हुसेन पिरू चौधरी वय ४० वर्ष रा.शहनवाजपुरा नायगाव, मोहम्मद सलीम चौधरी वय २८ वर्ष रा.मनकर्णा प्लॉट,मोहम्मद अशपाक मोहम्मद अन्वर वय २७ वर्ष रा.मुजफर नगर, ईमाण खान अमीन खान वय २६ वर्ष रा. नाजुक नगर, शेख हसन शेख ईबाहीम वय २५ वर्ष रा.नाजुक नगर, शेख मोहसीन शेख मुसा वय ३१ वर्ष रा.मोहता मिल रोड, शेख राजु शेख जाफर वय ३२ वर्ष रा. मोहता मिल रोड, मोहम्मद युनुस मोहम्मद हनिफ वय २२ वर्ष रा.मोहता मिल रोड,जिबरान खान अमीन खान वय २५ वर्ष रा. मोहता मिल रोड,शेख अमीर हसन पटेल वय ४२ वर्ष रा.मोहता मिल रोड गवळी पुरा यांना अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम ५२ हजार २७०, मोबाईल १२ किंमत १ लाख ५२ हजार रुपये, एक अ‍ॅटो व तीन मोटर सायकल किंमत ३ लाख ३० हजार असा एकुण ५ लाख ३४ हजार २७० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत वांघुर्डे, यांच्या मार्गदर्शनाखाली मिलिंदकूमार बहाकर यांनी व त्यांच्या पथकाने केली.

Web Title: Raid on big gamblers; 15 gamblers arrested, property worth Rs 6 lakh confiscated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.