बाेकडांच्या झुंजीवर चालणाऱ्या जुगारावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:16 AM2021-02-08T04:16:53+5:302021-02-08T04:16:53+5:30
अकाेला : आकाेट फैल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील दम्मानी नेत्र रुग्णालयाच्या पाठीमागे बाेकडांच्या झुंजीवर माेठ्या प्रमाणात जुगार अड्डा सुरू असतांना ...
अकाेला : आकाेट फैल पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील दम्मानी नेत्र रुग्णालयाच्या पाठीमागे बाेकडांच्या झुंजीवर माेठ्या प्रमाणात जुगार अड्डा सुरू असतांना पाेलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने रविवारी छापा टाकला. या ठिकाणावरून सहा बाेकूड जप्त करण्यात आले असून मुद्देमालही ताब्यात घेण्यात आला आहे.
दम्मानी नेत्र रुग्णालयाच्या पाठीमागे मैदान असून या मैदानावर ८ ते १० जण त्यांच्या बाेकडांची झुंज लढवून त्यांच्या हार जीतवर पैसे लावून जुगार अड्डा चालवित असल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी पथकासह छापा टाकून बाेकडांची झुंज लावतांना कालू महेबूब गोरवे, मोहम्मद हारिस अब्दुल राशिद, मोहम्मद फिरोज हाजी शब्बीर, तिघेही रा. गवळीपुरा, जय कनोजिया, चंपालाल कनोजिया, धीरज सुरेश कैथवास, राकेश मुन्ना बीचेले सर्व रा. बापूनगर व सलीम भिका गोरवे रा. नायगांव या आठ जणांना रंगेहाथ अटक केली. त्यांच्याकडून सहा बाेकूड, ९ हजार रुपये किमतीचे ४ माेबाइल, २८ हजार रुपये किमतीच्या खुर्च्या, टेबल, मंडप तसेच १० हजार रुपये किमतीचे इतर साहित्य एक लाख ५० हजार रुपये किमतीचे सहा एडके असा एकूण एक लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आराेपींविरुद्ध जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम १२(ब), भारतीय दंड विधानाच्या कलम ४२९, प्राण्यांची निर्दयतेने वाहतूक करून वागणूक देणे १९६० च्या कायद्यातील कलम ११ आ ड म न अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.