जुगार अड्ड्यावर धाड ; १३ जुगारी अटकेत, ५ लाखांचा ऐवज जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 01:33 PM2019-02-06T13:33:43+5:302019-02-06T13:34:46+5:30

मूर्तिजापूर : डिगंबर गुल्हाने यांच्या शहरात लागून असलेल्या सोनाळा शेतात जुगार सुरू असल्याची खबर मिळताच मूर्तिजापूर शहर पोलीसांनी  जुगार ...

Raid on gambling ; 13 arrested, 5 lakhs of money seized | जुगार अड्ड्यावर धाड ; १३ जुगारी अटकेत, ५ लाखांचा ऐवज जप्त

जुगार अड्ड्यावर धाड ; १३ जुगारी अटकेत, ५ लाखांचा ऐवज जप्त

googlenewsNext

मूर्तिजापूर : डिगंबर गुल्हाने यांच्या शहरात लागून असलेल्या सोनाळा शेतात जुगार सुरू असल्याची खबर मिळताच मूर्तिजापूर शहर पोलीसांनी  जुगार अड्ड्यावर धाड टाकून पाच लाखांच्या मुद्देमालासह १३ आरोपींना रंगेहात अटक केली. ही कारवाई ५ फेब्रुवारी रोजी रात्री १०:३० वाजता करण्यात आली.
     डिगंबर शंकरसा गुल्हाने यांच्या मालकीच्या शेतात वैभव लक्ष्मी बहुद्देशीय  संस्था मनोरंजन केंद्र सोनाळा रोड मूर्तिजापूर या नावाखाली परवानगी असलेला प्लास्टिक कॉईन खेळ चालत असे. या नियमाचे उल्लंघन करून प्लॅस्टिक कॉईन खेळाचे आड तीन पत्ती परेल जुगार चालू असलेल्याची माहीती शहर पोलीसांना मिळाली असता सापळा रचुन जुगार खेळणाऱ्या डिगंबर शंकरसा गुल्हाने मूर्तिजापूर, संजय महादेव धुळे रा. अंजनगाव सुर्जी, मंगेश जगताप ढाणे मूर्तिजापूर, मो. अजिज मो. ईस्माईल अकोला, संजय मदनलाल चितलांगे अकोला, गणेश गोविंद आप्पा टेवरे अंजनगावसुर्जी, धम्माल भास्कर वाघ रा.शेलू काटे वर्धा,सुरेश नानाभाऊ काळपांडे अंजनगावसुर्जी, राहुल अशोक जाधव नायगाव अकोला, दिलिप धनराज बोचे पणज अकोट, किशोर देविदास चतुरकर मूर्तिजापूर, मोहन दशरथ पोळ अकोला या १३ जुगारींना अटक केली आहे.  अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून २० हजार ३७५ रोख, ४ लाख २० हजार किंमतीच्या दोन दुचाकी, दोन कार, ७९ रुपयांचे प्लॅस्टिक कॉईन सिगरेट पाकिटे, टेबल, खुर्च्या, ५१ हजारांचे ११ मोबाइल असा ४ लाख ९७ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दत्तात्रेय आव्हाळे, पोलीस उपनिरीक्षक राजेश जोशी, मतिन शेख, नायक पोलीस शिपाई संजय खंडारे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल भांड, मनिष मालठाणे, योगेश उमक, सर्वेश कांबे, वाहन चालक दिपक वार, गिरी यांनी केली(शहर प्रतिनिधी)

Web Title: Raid on gambling ; 13 arrested, 5 lakhs of money seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.