जुगारावर छापा; १४ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 06:35 PM2020-02-10T18:35:57+5:302020-02-10T18:36:06+5:30
त्यांच्याकडून दोन लाख ३१ हजार ५९० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अकोला : एमआयडीसी पोलीस स्टेशनंतर्गत कुंभार रोड परिसरात सुरू असलेल्या जुगारावर जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकाने सोमवारी कारवाई केली. कारवाईत पोलिसांनी १४ जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून दोन लाख ३१ हजार ५९० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
कुभारी रोड लगत भंगार गोडावूनमागे जुगार खेळला जात असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक अमोघ गावकर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलींदकुमार बहाकार यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने छापेकारी करून १४ जणांना अटक केली. यामध्ये शेख फिरोज शेख मक्सुद (३०), इंद्रजीत रामशिपाही दहायत (३८) अफजल खान लियाकत खान (४२), श्रीकृष्ण नंदू वानखडे (३५), मोहम्मद निसार मो. शफी (४४), गणेश शाहादेव आघडे (४०), शिलधन रामेश्वर डोंगरे (४०), गजानन पांडूरंग चांदुरकर (५५), शंकर अंबर डिडीये (३०), गौतम सदाशिव भंडारे (६०), शेख गफुर शेख रसुद (४०), प्रवीण ज्ञानदेव डांबलकर (३०) यांचा समावेश आहे. आरोपीकडून ३६ हजार ५९० रोख, मोबाईल, मोटारसायकल, जुगार साहित्य, असा एकुण २ लाख ३१ हजार ५९० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी, व्यवसाय मालक शेर अली सरवर अली, एमएच ३० एफ ७४४९ चा चालकाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.