डाबकीरोडवरील जुगार अड्ड्यावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:21 AM2021-03-01T04:21:24+5:302021-03-01T04:21:24+5:30
सात जुगारी अटकेत पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त अकोला : डाबकीरोडवरील भारती प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर दहशतवादविरोधी ...
सात जुगारी अटकेत पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त
अकोला : डाबकीरोडवरील भारती प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर दहशतवादविरोधी कक्षाने रविवारी छापा टाकला. एका घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावरून सात जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
भारती प्लॉटमधील एका बंद घरात मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती दहशतवादविरोधी कक्षाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी सापळा रचून बंद घरात छापा टाकला. या ठिकाणावरून प्रमोद सुभाष देवधने, निळकंठ सीताराम डांगे, संतोष मन्साराम नावथडे, प्रवीण नामदेवराव कोठाळकर, नीलेश वसंतराव भोसले, सचिन शिवचरण उजाडे व विकास सुधाकर कोकाटे सर्व राहणार भारती प्लॉट यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पाच मोबाइल रोख रक्कम व मुद्देमाल असा एकूण ५० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी जुगारीविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.