कुरुम शिवारात गावठी हातभट्टीवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:14 AM2021-07-19T04:14:17+5:302021-07-19T04:14:17+5:30
गोपनीय माहितीवरून माना पोलिसांनी सापळा रचून कुरुम शिवारात हातभट्टीची दारू गाळणाऱ्या कुरुम येथील मोहन यशवंत सरदार (३८) व अ. ...
गोपनीय माहितीवरून माना पोलिसांनी सापळा रचून कुरुम शिवारात हातभट्टीची दारू गाळणाऱ्या कुरुम येथील मोहन यशवंत सरदार (३८) व अ. अकील अ.सलाम (४५) दोघेही (रा.कुरुम) यांना रंगेहाथ पकडून त्यांच्या जवळून मोहफुलाचा सडवा नासधूस केला. याप्रकरणी आरोपी मोहन सरदार व अ.अकील अ.सलाम यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय खंदारे यांचे मार्गदर्शनाखाली पो.उपनि.घनश्याम पाटील, हे.कॉ.दिलीप नागोलकर, पो.कॉ.चंद्रकांत नागपुरे, विठ्ठल राठोड, वैभव येळणे, चेतन राऊत यांनी केली.
-------------------
मधापुरी येथे वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या
कुरुम : पोलीस स्टेशन माना कार्यक्षेत्रातील ग्राम मधापुरी येथे ६५ वर्षीय वृद्धाने आजाराला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवार, १७ जुलै रोजी सकाळी ७ ते १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मधापुरी येथील गांधीनगर भागातील रहिवासी ६५ वर्षीय किसननाथ श्रावणनाथ शिंदे यांनी आजाराला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी माना पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.