गुटख्याच्या पाच अड्डय़ांवर छापेमारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 01:58 AM2017-09-08T01:58:59+5:302017-09-08T01:59:04+5:30
शहरातील मुख्य बाजारपेठेसह रजपूतपुरा येथे गुटखा माफियांच्या घरातील गुटखा साठय़ावर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाने गुरुवारी दुपारी छापेमारी केली. या छापेमारीत पाच गुटखा अड्डय़ांवर धाडी टाकण्यात आल्या असून, तब्बल आठ लाख रुपयांचा गुटखा साठा जप्त करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहरातील मुख्य बाजारपेठेसह रजपूतपुरा येथे गुटखा माफियांच्या घरातील गुटखा साठय़ावर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाने गुरुवारी दुपारी छापेमारी केली. या छापेमारीत पाच गुटखा अड्डय़ांवर धाडी टाकण्यात आल्या असून, तब्बल आठ लाख रुपयांचा गुटखा साठा जप्त करण्यात आला आहे.
राज्यात गुटखाबंदी केल्यानंतरही शहरासह जिल्हय़ात गुटख्याची मोठय़ा प्रमाणात छुप्या मार्गाने वाहतूक आणि खरेदी-विक्री सुरू आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांना गुरुवारी मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी गुटखा माफिया घनश्याम सीताराम अग्रवाल याच्या जुना भाजी बाजारातील जगदंबा सुपारी स्टोअर्स येथे छापा टाकून, या ठिकाणावरून गुटख्याचा साठा जप्त केला. त्यानंतर चमन सीताराम अग्रवाल याच्या मालकीच्या अंबिका ट्रेडर्स येथे धाड टाकून गुटखा साठा जप्त करण्यात आला. तिसरी कारवाई चंद्रनारायण लालचंद अग्रवाल याच्या भगवती सुपारी या दुकानावर करून, गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. त्यानंतर नितीन लालचंद अग्रवाल याच्या मालकीच्या भगवती ट्रेडर्स येथे छापा टाकून विशेष पथकाने गुटखा साठा जप्त केला. या चार ठिकाणांवर कारवाई सुरू असतानाच घनश्याम अग्रवाल याच्या निवासस्थानी गुटखा साठा असल्याची माहिती मिळताच विशेष प थकाचे प्रमुख व कर्मचार्यांनी रजपूतपुरा येथील घनशाम अग्रवाल याच्या निवासस्थानी छापा टाकून गुटखा साठा जप्त केला. या पाच गुटखा अड्डय़ावर छापेमारी करीत आठ लाख रुपयांचा गुटखा साठा जप्त करण्यात आला असून, चार जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये दोन ठिकाणी घनश्याम अग्रवाल या एकाच गुट खा माफियाचा गुटखा ठेवण्यात आल्याचे समोर आले. ही कारवाई विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे व त्यांच्या पथकाने केली.