खांबोरा, निमकर्दा, मोरझडी येथील जुगार अड्ड्यांवर छापेमारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:18 AM2021-04-21T04:18:21+5:302021-04-21T04:18:21+5:30
अकोला : उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खांबोरा निमकर्दा व मोरझडी येथे मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षक ...
अकोला : उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खांबोरा निमकर्दा व मोरझडी येथे मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाने सोमवारी रात्री उशिरा छापेमारी केली. या गावातील जुगार अड्ड्यावरून सुमारे १३ जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून दोन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
खांबोरा येथे मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी पथकासह छापा टाकला. या ठिकाणावरून वासुदेव रामभाऊ मारणे (वय ५५, रा. खांबोरा), देवीदास लक्ष्मण थोरे (वय ६५, रा. खांबोरा), राजू बाबूराव गवळी (वय ३२, रा. खाबोरा), दिगंबर हरिभाऊ बिलेवार (वय ५८, रा. खांबोरा), ईश्वरपुरी रामपुरी (वय ६०, रा. खांबोरा), दिलीप रामकृष्ण बिलेवार (वय ३८, रा. खांबोरा), विठ्ठल सुरेश बारगीर (वय ३८, रा. मंडाळा), साहेबराव मधुकर वकटे (वय ६५, रा. पाळोदी), गोविंदा समाधान कसुडकर (वय ३०, रा. मंडाळा), प्रमोद देवीदास चितळे (वय ४५, रा. खांबोरा) या दहा जुगाऱ्यांना अटक केली. त्यानंतर टाकळी निमकर्द येथे सुरू असलेल्या जुगारावर छापा टाकून विक्रम श्रीराम इंगळे (वय ४५, रा. निमकर्दा), राहुल प्रभाकर घ्यारे (वय ३०, रा. कवठा व मोरझाडी येथील जुगारावरून लक्ष्मण नारायण भगत (रा. मोरझाडी) या १३ जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे सहा मोबाइल, सहा हजार रुपये रोख व एक गाडी असा एकूण दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या जुगाऱ्यांविरुद्ध उरळ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार बंदी प्रतिबंधात्मक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.