दोन बड्या जुगार अड्ड्यावर धाड; १५ जुगारींकडून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 04:16 PM2020-07-04T16:16:07+5:302020-07-04T16:16:25+5:30

या जुगार अड्ड्यावरुन १५ जुगारींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Raids on two gambling spot; 2 lakh seized from 15 gamblers | दोन बड्या जुगार अड्ड्यावर धाड; १५ जुगारींकडून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त 

दोन बड्या जुगार अड्ड्यावर धाड; १५ जुगारींकडून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त 

Next

अकोला : एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या आशीर्वादाने एमआयडीसीतील कुंभारी रोडवर मोठ्या धुमधडाक्यात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर व त्यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री छापा टाकला. या जुगार अड्ड्यावरुन १५ जुगारींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा सुरू असताना एमआयडीसी पोलीस झोपेत होते का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
एमआयडीसीतील कुंभारी रोडलगत मोठ्या प्रमाणात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर व त्यांच्या पथकाला मिळाली; मात्र ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा जुगार अड्डा सुरू होता त्या पोलिसांना माहिती न मिळाल्याने त्यांची हप्तेखोरी विशेष पथकाच्या छाप्यानंतर उघड झाली. पथकाने सापळा रचून शुक्रवारी रात्री सदर जुगार अड्ड्यावर छापा टाक ल्यानंतर गजानन अंबादास भोवते वय ४४ वर्ष रा.तथागत नगर शिवणी, शेख गफुर शेख रसुल वय ४० रा.आंबेडकर नगर दिग्रस जि.यवतमाळ, प्रशांत कार्तिकप्रसाद अतोरे (ठाकूर) वय २८ वर्ष रा.ज्योती नगर जठारपेठ, पद्मानंद लक्ष्मण तायडे वय २८ वर्ष रा. कुंभारी, भरत अंबादास लोखंडे वय ४० वर्ष ह.मु विकास मार्बल एम.आय.डी.सी यांना अटक करण्यात आली. त्यानंतर टोयोटा शोरुमजवळ सुरू असलेल्या दुसऱ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून शेर अली सरवर अली रा.सैयद नगर शिवणी, सुरेश ज्योतीराम इंगळे वय ५५ वर्ष रा.शरद नगर शिवर, पुंडलीक हरिभाऊ ढगे वय ६४ वर्ष रा.अनुसया नगर शिवर, गजानन मनोहर तायडे वय ४२ वर्ष रा.पळसो बढे,राजू सुखदेव वानखडे वय ४९ वर्ष रा.अनुसया नगर शिवर, गंगाराम बळीराम धांडे वय ५० वर्षे रा.अनुसया नगर शिवर,त्र्यंबक जयराम गवई वय ६४ वर्ष रा.सावित्रीबाईल फुले चौक शिवर, भाग्यवान वामनराव वानखडे वय ३० वर्ष रा.सावित्रीबाई फुले नगर शिवर,संतोष यशवंत पाटील वय ४५ वर्ष रा. अनुसया नगर शिवर,अमोल अंबादास गवई वय ३३ वर्ष रा.अनुसया नगर शिवर या १५ जुगारींना अटक केली. त्यांच्याकडून रोख, मोबाइल, दुचाकी असा एकूण दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर व त्यांच्या पथकाने केली.

 

Web Title: Raids on two gambling spot; 2 lakh seized from 15 gamblers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.