रेल्वे पुलाचा कठडा कोसळला; गँगमन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 01:57 AM2017-09-18T01:57:25+5:302017-09-18T01:58:36+5:30

कुरुम : टाकळी ते कुरूमदरम्यानच्या रेल्वे पुलावरील सिमेंटचा कठडा अचानक कोसळून एक गँगमन ठार, तर नऊ जण जखमी झालेत. रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास कुरूमकडून बडनेराकडे मालगाडी जात असताना हा अपघात घडला. 

Railway bridge collapses; Gangman killed | रेल्वे पुलाचा कठडा कोसळला; गँगमन ठार

रेल्वे पुलाचा कठडा कोसळला; गँगमन ठार

Next
ठळक मुद्देकुरुम स्टेशननजीकची घटना रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घटना घडली कुरूमकडून बडनेराकडे मालगाडी जात असताना अपघात घडला

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरुम (अकोला): टाकळी ते कुरूमदरम्यानच्या रेल्वे पुलावरील सिमेंटचा कठडा अचानक कोसळून एक गँगमन ठार, तर नऊ जण जखमी झालेत. रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास कुरूमकडून बडनेराकडे मालगाडी जात असताना हा अपघात घडला. 
रमेश विठ्ठल गोंधळकर (५२,रा.आरपीएफ रेल्वे कॉर्टर, बडनेरा) असे मृताचे तर विनोद नरेश शर्मा (३३), पिंटू नरहरी भिमकर (३५), रविकुमार पंडित (२८), सूरज संदीप इंगळे (२५), राकेश चिंतामण कांबळे (३२), कैलास सोमाजी बच्छाव (५८), मुकुंद राजाराम आठवले (५८,रा.बेलोरा विमानतळ), मधुकर नथ्थुजी खंडारे (५९, खरपी) व दिनेश महादेव वासनिक (३0, सर्व रा. रेल्वे क्वॉर्टर, बडनेरा) अशी जखमींची नावे आहेत. बडनेरा रेल्वे विभागाचे दहा ते बारा गँगमन रविवारी टाकळी ते कुरुमदरम्यान एका रेल्वे पूलावर ट्रॅक तपासणीचे काम करीत होते. दरम्यान अचानक रेल्वे जात असल्याची सूचना गँगमनला मिळाली. त्यामुळे सर्व गँगमन धावपळ करीत रेल्वे पुलाच्या दोन्ही बाजूंच्या सिमेंटने बनलेल्या सुरक्षा कठड्यावर उभे राहिले. मात्र, एका बाजूचा सिमेंटचा कठडा तुटल्याने नऊ गँगमन २५ फूट खाली कोसळले. याअपघातात गँगमनच्या अंगावर लोखंडी सळाखी, दगड व गिट्टी पडल्याने ते जखमी झाले. यामध्ये गंभीर जखमी झालेला गँगमन रमेश गोंधळकर याचा मृत्यू झाला तर अन्य आठ जण जखमी झालेत. 
याघटनेची माहिती मिळताच बडनेरा रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक सी.एच.पटेल, रेल पथचे सिनीअर सेक्शन इंजिनिअर वाडेकर यांच्यासह अन्य अधिकारीसुद्धा घटनास्थळी पोहोचले.  यावेळी नांदगाव खंडेश्‍वरचे तहसीलदार मनोज लोणारकर यांनी जखमींची भेट घेतली. 

Web Title: Railway bridge collapses; Gangman killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.