दर्यापूर रस्ता-अकोला मार्गाला जोडणारा रेल्वेचा भुयारी मार्ग प्रलंबित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:18 AM2020-12-24T04:18:39+5:302020-12-24T04:18:39+5:30
पुर्णा- खंडवा या मीटरगेज मार्गाचे ब्राँडगेजमध्ये रूपांतर करण्यात आले. दरम्यान, दर्यापूर मार्ग ते अकोला रस्त्याला जोडणाऱ्या भुयारी मार्गाची मागणी ...
पुर्णा- खंडवा या मीटरगेज मार्गाचे ब्राँडगेजमध्ये रूपांतर करण्यात आले. दरम्यान, दर्यापूर मार्ग ते अकोला रस्त्याला जोडणाऱ्या भुयारी मार्गाची मागणी मागील तीन वर्षांपासून अकोट शहरातील सामाजिक संस्थांकडून केली जात आहे. त्याकरिता केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार संजय धोत्रे तथा तत्कालीन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी हा मार्ग आवश्यक असून, तो तत्काळ मंजूर करावा, असे पत्र दक्षिण रेल्वेचे डीआरएम यांना पाठविले हाेते. त्यावेळी रेल्वे मार्गाची पाहणी करण्यासाठी आलेले व्यवस्थापक गजानन मलिया यांना निवेदन देण्यात आले होते. भुयारी मार्गाचा नकाशा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात सादर केला आहे. हा मार्ग विद्यार्थी, पादचारी, सायकलस्वार यांना सोयीचा होवू शकतो. शिवाय रेल्वे पुलावर वाहतुक ठप्प झाल्यास हा मार्ग पर्यायी ठरणार आहे. यासंदर्भात तातडीने पाठपुरावा करण्याची मागणी निवेदनाद्वारे संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने नंदकिशोर शेगोकार, आनंद भोरे, संजय बोराेडे, ॲड. सचिन खलोकार नितीन शेगोकार, अजय नवघरे तथा समितीच्या सदस्यांनी केली आहे.
फोटो