अकोला-खंडवा रेल्वे मार्गावरील रेल्वेची गती वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 02:28 PM2018-10-24T14:28:13+5:302018-10-24T14:28:44+5:30
अकोला : मध्य प्रदेशातील खंडवा स्टेशनहून मलकापूर मार्गेअकोल्यात पोहोचणारी प्रवासी रेल्वेगाडी आणि मालगाडी यांची गती वाढणार आहे. या सर्व ...
अकोला: मध्य प्रदेशातील खंडवा स्टेशनहून मलकापूर मार्गेअकोल्यात पोहोचणारी प्रवासी रेल्वेगाडी आणि मालगाडी यांची गती वाढणार आहे. या सर्व रेल्वेगाड्या याआधी केवळ प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर थांबायच्या. या गाड्यांना इतर प्लॅटफॉर्मवर थांबण्याची व्यवस्था नव्हती; मात्र ही समस्या लक्षात घेऊन मध्य रेल्वे आणि दक्षिण मध्य रेल्वे मंडळाने एकत्रित येऊन पॉइंट देण्याची सुविधा केली. त्यामुळे या गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ आणि ५ वर थांबू शकतील. अशी माहिती भुसावळ रेल्वे मंडळाचे ‘एडीआरएम’ मनोज कुमार सिन्हा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.भुसावळ मध्य रेल्वे मंडळाचे एडीआरएम मनोज कुमार सिन्हा, भुसावळ हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेसने अकोल्यात आले होते.
खंडवाहून अकोला रेल्वेस्थानकावर पोहोचणारी प्रवासी गाडी आणि मालगाडी यापूर्वी थांब्यासाठी ताटकळत राहत असे. एकच प्लॅटफॉर्मवर लाइन दिल्या जात असल्याने ही समस्या निर्माण व्हायची. त्यामुळे प्रवाशांना उशीर व्हायचा; मात्र प्लॅटफॉर्म क्रमांक ४ आणि ५ ची सुविधा मिळाल्याने आता या मार्गांवरील गाड्यांची गती वाढणार आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, मंगळवारी दक्षिण मध्य रेल्वेचेचे नांदेड येथील प्रबंधक कार्यालयाचे तंत्रज्ञही अकोल्यत पोहोचले. गत अनेक वर्षांपासून रेंगाळत असलेल्या या तांत्रिक मागणीवर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला गेला. यासंदर्भात ‘लोकमत’ने अनेकदा हा विषय प्रकाशझोतात आणला. याबाबत खासदार संजय धोत्रे यांच्याशीदेखील चर्चा करण्यात आली होती. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही मागणी पूर्ण झाली आहे.