पाऊस पुन्हा बरसलाच!
By Admin | Published: October 9, 2016 02:55 AM2016-10-09T02:55:40+5:302016-10-09T02:55:40+5:30
एक दिवसाची उसंत दिल्यानंतर पुन्हा शनिवारी पावसाने हजेरी लावली; सोयाबीन पीक हातचे जाण्याची भिती.
अकोला, दि. 0८- एक दिवसाची उसंत दिल्यानंतर पुन्हा शनिवारी पावसाने हजेरी लावल्याने, आता मात्र संपूर्ण सोयाबीन पीक हातचे जाण्याच्या भीतीने शेतक र्यांची चिंता वाढली असून, या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
जिल्हय़ात मागील एक महिन्यापासून सतत पाऊस सुरू आहे. या पावसाने पिण्याच्या पाण्याची सोय व गुरांना हिरवा चारा मिळाला, पण दुसरीकडे मात्र शेतकर्यांच्या तोंडचा घास पळविला आहे. शनिवारी सकाळी सर्वत्र ऊन पडल्याने शेतकरी आनंदी होता. सोयबीन काढणीची लगबग सुरू केली. थ्रेशर बाहेर काढले; परंतु दुपारी ४ वाजतानंतर अचानक आकाशात ढग तयार झाले आणि पावसाला सुरू वात झाली. शहरात रात्री पाऊस सुरू च होता. दरम्यान, या बदलत्या हवामानामुळे अनेक आजार वाढले असून, बच्चे कंपनी व वृद्धांना जाचक ठरत आहे.