अवकाळी पावसाचा अकोला जिल्ह्यातील फळे, भाजीपाला पिकांना फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 01:31 PM2018-03-13T13:31:24+5:302018-03-13T13:31:24+5:30

अकोला : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील आंबा, फळे, भाजीपाला पिकांना फटका बसला आहे. ढगाळ वातावरण कायम असल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे.

rain in Akola district, vegetable crops hit! | अवकाळी पावसाचा अकोला जिल्ह्यातील फळे, भाजीपाला पिकांना फटका!

अवकाळी पावसाचा अकोला जिल्ह्यातील फळे, भाजीपाला पिकांना फटका!

Next
ठळक मुद्दे जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, अधून-मधून मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. जिल्ह्यातील कमाल तापमान ३७.६, तर किमान तापमान १९.१ अंशाने घट झाली आहे.अगोदर बोंडअळी, कमी पावसामुळे झालेले पिकांचे नुकसान, धान्याचे घटलेले भाव यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे.

अकोला : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील आंबा, फळे, भाजीपाला पिकांना फटका बसला आहे. ढगाळ वातावरण कायम असल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. दरम्यान, रविवारी झालेल्या पावसामुळे रात्रीच्या किमान तापमानात २२ अशांवरू न १९ अशं एवढी घट झाली असून, रात्रीचा गारवा वाढला आहे.
जिल्ह्यात गत आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, अधून-मधून मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. रविवारी तर १५ ते २० मिनिटे धुवाधार पावसाने हजेरी लावल्याने आंब्यांचा मोहोर गळाला. भाजीपाल्याचे काही ठिकाणी नुकसान झाले. जिल्ह्यातील पातूर व इतर तालुक्यातील आंब्याला विशेष मागणी असते. पण, मागील काही वर्षांपासून या आंब्याचे दर्शन दुर्लभ झाले. यावर्षी तरी हा आंबा मिळेल, अशी अपेक्षा असताना सतत पाऊस येत असल्याने तिही आशा मावळली आहे. काही ठिकाणी संत्रा फळाला फटका बसला आहे. सातत्याने संकटाचा सामना करणाºया शेतकरी या निसर्गाच्या कोपाने हवालदिल झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कमाल तापमान ३७.६, तर किमान तापमान १९.१ अंशाने घट झाली आहे.
या अगोदर बोंडअळी, कमी पावसामुळे झालेले पिकांचे नुकसान, धान्याचे घटलेले भाव यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे.
ढगाळ वातावरण अद्याप कायम असून, त्यामुळे पावसाची शक्यता नाकारता येत नसल्याने शेतकरी केवळ आता बघ्याच्या भूमिकेत आहेत.

 

Web Title: rain in Akola district, vegetable crops hit!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.