पाऊस लाबंला; मूग, उडिदाचे क्षेत्र घटणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 01:44 PM2018-06-20T13:44:03+5:302018-06-20T13:44:03+5:30

अकोला : राज्यात पाऊस लांबल्याने पीक पेरणीवर परिणाम होत असून, यावर्षीही मूग, उडिदाचे क्षेत्र घटणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Rain delayed; sowing of greeng gram will decrease! |  पाऊस लाबंला; मूग, उडिदाचे क्षेत्र घटणार!

 पाऊस लाबंला; मूग, उडिदाचे क्षेत्र घटणार!

Next
ठळक मुद्देशेतकरी सध्या द्विधा मनस्थितीत असल्याने बियाणे बाजारात आतापर्यंत २५ ते ३० टक्केच बियाणे खरेदी झाली आहे.यावर्षी पुन्हा पाऊस लांबला असून, मागील तीन वर्षांचा पावसाचा अनुभव बघता, शेतकºयांनी अद्याप बियाणे खरेदीला सुरुवात केली नाही. यावर्षी आतापर्यंत केवळ २५ ते ३० टक्केच बियाणे खरेदी झाली असल्याचे कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

अकोला : राज्यात पाऊस लांबल्याने पीक पेरणीवर परिणाम होत असून, यावर्षीही मूग, उडिदाचे क्षेत्र घटणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी सध्या द्विधा मनस्थितीत असल्याने बियाणे बाजारात आतापर्यंत २५ ते ३० टक्केच बियाणे खरेदी झाली आहे.
शेतकऱ्यांना तूर, हरभºयाचे चुकारे अद्याप मिळाले नाहीत. काही शेतकºयांनी खरेदीच्या मुहूर्तावर हरभरा विकला; पण तेही चुकारे अद्याप मिळाले नाहीत. यावर्षी पुन्हा पाऊस लांबला असून, मागील तीन वर्षांचा पावसाचा अनुभव बघता, शेतकºयांनी अद्याप बियाणे खरेदीला सुरुवात केली नाही. मागील दोन वर्षे शेतकºयांनी पावसाच्या अगोदर बियाणे खरेदी केले; पण पाऊस वेळेवर न आल्याने बियाणे परत करण्यासाठी गेलेल्या शेतकºयांचे बियाणे परत घेण्यात आले नाहीत. त्यामुळे यावर्षी आतापर्यंत केवळ २५ ते ३० टक्केच बियाणे खरेदी झाली असल्याचे कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
जूनच्या दुसºया आठवड्यात मूग, उडिदाची पेरणी केली जाते. पाऊस लांबला असून, मागच्या वर्षी मुगाचे पीक हातचे गेल्याने यावर्षी मूग, उडिदाची पेरणी घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ व कृषी विभागाने मूग, उडिदाचे क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज वर्तविला होता; पण पुन्हा यावर्षी हे क्षेत्र घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या सर्व परिस्थितीमुळे कापसाकडे वळणारा शेतकरी सोयाबीन बियाण्यांची पेरणी करणार, असे सध्या चित्र आहे.

 बाजारात आतापर्यंत २५ ते ३० टक्केच बियाणे खरेदी झाली असून, पेरणी मात्र नाममात्र झाली. घेतलेले बियाणे पुन्हा परत घेतले जात नसल्याने शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
मोहन सोनोने, कृषी निविष्ठा विपणन अभ्यासक, अकोला.

 

Web Title: Rain delayed; sowing of greeng gram will decrease!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.