पावसाने ओलांडली सरासरी

By admin | Published: August 7, 2015 01:34 AM2015-08-07T01:34:32+5:302015-08-07T01:34:32+5:30

जलप्रकल्पांमधील साठ्यातही वाढ

Rain exceeds the average | पावसाने ओलांडली सरासरी

पावसाने ओलांडली सरासरी

Next

अकोला : जून महिन्यानंतर दांडी मारलेला पाऊस अखेर ४ आॅगस्टपासून दोन दिवस संततधार बरसला. या पावसाने जिल्ह्यातील सरासरी ओलांडली असून, जिल्ह्यातील जलप्रकल्पांमधील जलसाठ्यातही वाढ झाली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६९७.३ मिलीमीटर असून, आतापर्यंत सरासरीच्या ६५.९४ टक्के म्हणजेच ४५९.७७ मि.मी. पाऊस झाला आहे. ५ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात सरासरी ४०१.९ मि.मी. पाऊस अपेक्षित असतो. त्या तुलनेत आतापर्यंत ११४.४० टक्के पाऊस झाला आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी २९ मि.मी. पाऊस झाला.
यावर्षी ७ ते १७ जूनदरम्यान जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र, त्यानंतर तब्बल दोन महिने पाऊस झालाच नाही. परिणामी पिके तर कोमेजली होतीच, सोबतच जलप्रकल्पांनीही तळ गाठला होता. दोन महिन्यांच्या दडीनंतर ४ व ५ आॅगस्ट रोजी पाऊस बरसला. या दोन दिवसांत अकोल्यात २०६ मिमी पाऊस झाला. अकोला तालुक्याची ६ आॅगस्टपर्यंतची सरासरी ४१०.७० मिमी असून, ५१८.०० मिमी पाऊस झाला आहे. ही टक्केवारी १२६.१३ आहे. जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्येही ६ आॅगस्टपर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

Web Title: Rain exceeds the average

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.