पाऊस लांबला; भाजीपाला महागला

By Admin | Published: June 28, 2014 10:35 PM2014-06-28T22:35:29+5:302014-06-28T22:38:40+5:30

पावसाने दडी मारल्यामुळे शेतातील भाजीपाला करपला असून, आवक घटली आहे.

Rain is far away; Vegetable expensive | पाऊस लांबला; भाजीपाला महागला

पाऊस लांबला; भाजीपाला महागला

googlenewsNext

बुलडाणा: दररोजच्या जेवणातील भाजीपाला चांगलाच महागला आहे. पावसाने दडी मारल्यामुळे शेतातील भाजीपाला करपला असून, आवक घटली आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या महागाईने उच्चांक गाठल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. पाऊस न झाल्यास हे दर आणखी वाढतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
जूनचा अखेरचा आठवडा सुरू झाला तरी पावसाचा पत्ता नाही. पिकांना देण्यासाठी पाणी नाही आणि पाऊस नाही. त्यामुळे नवीन लागवड झाली नाही. परिणामी आवक एकदम घटली. मध्यंतरी भाजीपाल्याचे दर घसरले होते. दर इतके घसरले की भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली होती. परंतु सध्या बाजारात भाजीपाला येत नाही. भाजीपाला येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. दहा शेतकर्‍यांकडून हा माल जमा करावा लागतो.
पाणी कमी पडल्याने करपलेला भाजीपाला बाजारात येत असून, तो लवकर खराब होतो. त्यामुळे नासाडी गृहीत धरून किरकोळ विक्रेते भाजीपाला खरेदी करतात. आवक नाही. त्यात नासाडी वाढली असून, साठविणे अशक्य आहे. आवक घटल्यास भाजीपाल्याचे दर आपोआप वाढत असतात. त्यानुसारच हे दर वाढत असून, भाजीपाला कडाडला आहे.
पाऊस न पडल्यास हे दर आणखी वाढतील,असे भाजीपाला व्यापार्‍यांचे म्हणणे आहे. शहरासह जिल्ह्यातून होणारी भाजीपाल्याची आवक घटली आहे. इतर शहरांतून भाजीपाला आवक केल्यास त्याचे दर अधिक असतात. त्यामुळे तेही परवडत नाही.
शहरातील भाजी बाजारामध्ये शेतकरी सकाळी भाजीपाला विक्रीसाठी घेऊन येतात. व्यापार्‍यांकडून लिलाव करण्यात करण्यात येतो. लिलावासाठी शहरातील किरकोळ व्यापारी सकाळी दाखल होतात. व्यापार्‍यांकडून घेतलेला भाजीपाला किरकोळ विक्रेते शहरातून फिरतात. तसेच काही चौकात बसूनही भाजी विक्रीचा व्यवसाय करत आहेत.त्यांच्यामार्फत शहरात भाजीपाला थेट ग्राहकांपयर्ंत पोहोचविला जातो.

Web Title: Rain is far away; Vegetable expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.