विदर्भात पुढील २४ तासात विजांसह बरसणार पाऊस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 18:02 IST2020-09-22T18:00:16+5:302020-09-22T18:02:53+5:30
विजांसह मध्यम ते साधारण स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

विदर्भात पुढील २४ तासात विजांसह बरसणार पाऊस!
ठळक मुद्देवेधशाळेचा अंदाजसावधगिरीच्या सूचना
अकोला : शहरासह जिल्ह्यात मंगळवारी मेघगर्जनेसह पावसाने हजेरी दिली. प्रादेशिक हवामान केंद्राने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये पुढील २४ तासात विजांसह मध्यम ते साधारण स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मागील २४ तासांपासून वातावरणात बदल झाला आहे. आकाशात ढग असून, काही ठिकाणी पाऊस पडला. २१ सप्टेंबरच्या सायंकाळी बहुतेक ठिकाणी विजांसह पाऊस झाल्याची नोंद आहे. वेधशाळेने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासात जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस होईल.