पावसाने फिरविली पाठ; शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:14 AM2021-07-04T04:14:22+5:302021-07-04T04:14:22+5:30

जिल्ह्यातील सध्याची स्थिती आतापर्यंत अपेक्षित पाऊस १७०.० मिमी प्रत्यक्ष झालेला पाऊस ९५.५ मिमी आतापर्यंत झालेली पेरणी २९.१४ टक्के सोयाबीनचा ...

The rain turned the back; Crisis of double sowing on farmers! | पावसाने फिरविली पाठ; शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट!

पावसाने फिरविली पाठ; शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट!

Next

जिल्ह्यातील सध्याची स्थिती

आतापर्यंत अपेक्षित पाऊस १७०.० मिमी

प्रत्यक्ष झालेला पाऊस ९५.५ मिमी

आतापर्यंत झालेली पेरणी २९.१४ टक्के

सोयाबीनचा पेरा ३४ टक्क्यांवर

पावसाअभावी उडीद, मुगाचा हंगाम गेल्याने अनेक शेतकरी सोयाबीनची पेरणी करण्याच्या विचारात आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ३४ टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र २ लाख १८ हजार ८८६ हेक्टर आहे. यामध्ये ७४ हजार ८३४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली.

कोणत्या तालुक्यात किती पाऊस/पेरणी

तालुका पाऊस (मिमी) पेरणी (हेक्टरमध्ये)

अकोट ४९.४

तेल्हारा ८४.०

बाळापूर ७३.४

पातूर १२१.६

अकोला ७४.८

बार्शीटाकळी १३७.३

मूर्तिजापूर १५५.५

...तर दुबार पेरणी

ज्या शेतकऱ्यांकडे सिंचन उपलब्ध आहे, असे शेतकरी पिकांना पाणी देऊन पिके जगवीत आहे; परंतु कोरडवाहू शेतकऱ्यांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे. येत्या काही दिवसांमध्ये पाऊस न झाल्यास पिके सुकून दुबार पेरणीची वेळ येऊ शकते.

देव अशी परीक्षा दरवर्षी का घेतो?

सोयाबीन, तुरीची ९ एकरात पेरणी केली आहे. सिंचन उपलब्ध आहे; परंतु पाऊस नसल्याने पिके कोमेजण्याच्या मार्गावर होती. त्यामुळे नवीन ५ रेनपाइप विकत घेतले आहे. यामाध्यमातून पिकांना पाणी देण्यात येणार आहे.

- रमेश निमकर्दे, शेतकरी, पातूर

सध्या शेतात तूर पेरली आहे. काही दिवसांआधी पाऊस झाला. त्यामुळे ओलावा टिकून आहे; परंतु दुपारच्या सुमारास पिके कोमेजून जात आहे. त्यामुळे आता पावसाची सक्त आवश्यकता आहे. ढगाळ वातावरण तयार होते आणि निघून जाते.

- देवीदास धोत्रे

ज्या शेतकऱ्यांकडे पाणी देण्याची सोय आहे, तेथे पाणी देऊन पेरणी करू शकतात. ज्या शेतात ओलावा नाही, तेथे पेरणी करू नये. १५ जुलैपर्यंत हंगाम असतो. १० जुलैपर्यंत पाऊस आल्यास संकट टळू शकते.

- डॉ. कांतप्पा खोत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Web Title: The rain turned the back; Crisis of double sowing on farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.