वरूर जऊळका परिसरात पाऊस; शेतकरी सुखावला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:24 AM2021-08-20T04:24:11+5:302021-08-20T04:24:11+5:30
आधीच या भागांमध्ये पेरण्यांना उशीर झाला आहे. पिके वर आल्यानंतर सतत १५ दिवस पावसाने दांडी मारली होती. गेल्या दोन ...
आधीच या भागांमध्ये पेरण्यांना उशीर झाला आहे. पिके वर आल्यानंतर सतत १५ दिवस पावसाने दांडी मारली होती. गेल्या दोन दिवसआधीच या भागांमध्ये चांगल्या प्रमाणात पावसाचे आगमन झाले. त्यामुळे हा पाऊस जणू पिकांना वरदान ठरत आहे. या वर्षीसुद्धा शेतकऱ्यांनी मूग, उडीद, सोयाबीन, कपाशी, तूर, ज्वारी या पिकांचा पेरा केलेला आहे; परंतु पाऊस पाहिजे त्या प्रमाणात येत नसल्यामुळे शेतकऱ्यांना गेल्या चार-पाच वर्षांपासून उत्पन्न कमी होत आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी आर्थिक अडचणींना सामोरे जात आहेत. मागील वर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पेरा केलेला होता; मात्र या पिकांना लागलेला खर्चसुद्धा निघाला नाही. या वर्षीसुद्धा तीच परिस्थिती ओढावते की काय, या विवंचनेत शेतकरी आहे. १०-१५ दिवस आधी शेतकऱ्यांनी शेतातील आंतर मशागत आटोपली आहे. नुकतेच पावसाने आगमन केल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे.