पावसाचा तुरीला फायदा अन् तोटाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 03:20 PM2018-11-21T15:20:16+5:302018-11-21T15:20:32+5:30
अकोला: राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाचा तूर पिकाला फायदा आणि तोटाही होण्याची चिन्हे आहेत. जोरदार पावसामुळे फुलोरा गळती झाली असून, जेथे शेंगा धरल्या तेथे मात्र हा पाऊस शेंगा भरण्यास पोषक ठरला आहे.
अकोला: राज्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाचा तूर पिकाला फायदा आणि तोटाही होण्याची चिन्हे आहेत. जोरदार पावसामुळे फुलोरा गळती झाली असून, जेथे शेंगा धरल्या तेथे मात्र हा पाऊस शेंगा भरण्यास पोषक ठरला आहे. सारख्या ढगाळ वातावरणामुळे शेंगा पोखरणाºया अळ््यांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
राज्यात यावर्षी कमी पाऊस झाल्याने खरीप पिकांच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाला. कापूस, तूर पीक बºयापैकी जमले होते. तथापि, पात्या, फुले धरणाच्या अवस्थेत पावसाने दीर्घ दडी मारल्याने बरड, हलक्या जमिनीतील कापसाचे उत्पादन घटले आहे. तूर पीक तग धरू न आहे. काही भागात या पिकाला चांगला बहर आला. तथापि, गत आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होत असल्याने शेंगा पोखरणाºया अळ््यांनी बºयाच ठिकाणी या पिकावर आक्रमण केले आहे. त्यातच दोन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने अनेक ठिकाणी तुरीचा फुलोरा गळती सुरू झाली; पण ज्या ठिकाणी तुरीला शेंगा धरल्या आहेत, तेथे शेंगा परिपक्व होण्यास, भरण्यास चांगली मदत झाली आहे. हरभरा पेरणी केली; पण ओलाव्याअभावी बियाणे उगवले नसतील तेथील बियाणे उगवण्यास हा पाऊस पोषक ठरला आहे.
सध्या फुलोरा व शेंगा धरण्याच्या अवस्थेत तूर पीक आहे. यावर शेंगा पोखरणाºया अळींचा प्रादुर्भाव होतो. पिसारी पतंगही हीच संधी साधून आक्रमण करतो. या अळीचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकºयांनी शेताचे सर्वेक्षण करावे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ठरवून दिलेल्या शिफारशीनुसार कीटकनाशकांची फवारणी करण्याची गरज आहे.
अवकाळी पावसाचा फायदा व तोटाही होणार आहे. अळ्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
- डॉ. मोहन खाकरे,
ज्येष्ठ कृषी विद्यावेत्ता,
डॉ. पंदेकृवि, अकोला.