अकोल्यात पावसाचा कहर, सखल भागात साचले पाणी, मोर्णा नदीला पूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:13 AM2021-07-23T04:13:00+5:302021-07-23T04:13:00+5:30
पुलाचा भराव खचला अकोला शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील मोर्णा नदीवरचा पुलाचा भराव पाण्यामुळे खचला. सुदैवाने यावेळी वाहतूक नसल्याने मोठी ...
पुलाचा भराव खचला
अकोला शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील मोर्णा नदीवरचा पुलाचा भराव पाण्यामुळे खचला. सुदैवाने यावेळी वाहतूक नसल्याने मोठी दुर्घटना टळली. दुपदरी असलेल्या या पुलाच्या उत्तरेकडील बाजूचा भरावा खचला. स्थानिक प्रशासनाने तातडीने पुलाची एक बाजू वाहतुकीसाठी बंद केली.
सांगवी खुर्द गावाचा संपर्क तुटला
अकोला तालुक्यात माेर्णा नदीकाठी असलेल्या सांगवी खुर्द गावात पुराचे पाणी शिरल्याने गावाचा उर्वरित भागाशी संपर्क तुटला आहे. नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यात उमेश श्रीकृष्ण मोरे यांचा ट्रॅक्टर वाहून गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
भाजप लोकप्रतिनिधींनी केली पाहणी
आमदार रणधीर सावरकर व गोवर्धन शर्मा यांच्या नेतृत्वात भाजपच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी रात्रभर वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देऊन शहरातील पूर स्थितीचा आढावा घेतला.