पावसाचा कहर; मोर्णा, विद्रुपा नद्यांना पूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:13 AM2021-07-23T04:13:14+5:302021-07-23T04:13:14+5:30
खडकीला सर्वाधिक फटका पुराचा सर्वाधिक फटका विद्रूपा नदीकाठी वसलेल्या खडकी भागाला बसला. खडकी परिसरातील मोहोकार लेआउट, सूर्या गार्डन ...
खडकीला सर्वाधिक फटका
पुराचा सर्वाधिक फटका विद्रूपा नदीकाठी वसलेल्या खडकी भागाला बसला. खडकी परिसरातील मोहोकार लेआउट, सूर्या गार्डन या वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरले. अनेक घरांमध्ये सहा फुटापर्यंत पाणी भरले होते. रात्री अचानक पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. तळमजला पाण्याखाली गेल्याने अनेकांना वरच्या माळ्यावर धाव घ्यावी लागली. या भागातील लोकांना अखेर रेस्क्यू ऑपरेशन राबवून बोटीद्वारे सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.
खोलेश्वर, अनिकट, गीता नगरमध्येही घुसले पाणी
मोर्णा नदीकाठी वसलेल्या खोलेश्वर, अनिकट, गीता नगर या भागांमध्ये पुराचे पाणी घुसले. रात्रभर धो धा पाऊस बरसल्यामुळे या भागांमधील घरांमध्ये पाणी साचले. रस्त्यांवर गुडघाभर पाणी असल्यामुळे रात्री बाहेर पडणेही मुश्कील झाले होते. सिंधी कॅम्प, खदान या भागांमध्येही मोर्णा नदीचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले.
जुने शहर जलमय
मोर्णा नदीला आलेल्या पुराचे पाणी बुधवारी रात्री कॅनालद्वारे जुन्या शहरात शिरले. कॅनालला लागून असलेल्या डाबकी रोड व गुरुदत्त नगर भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या भागातील मंगेश परेकार यांच्या घर व दुकानात पाणी शिरल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. लगतच्या घरांचीही हीच स्थिती होती. रेणुकानगर, आश्रयनगरमध्येही पाण्याचा मोठा संचय झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. डाबकी रेल्वे गेट परिसरातील जाजू नगर व लगतच्या भागांमध्येही पाणी साचले होते. या भागातील हॉटेल, शाळांच्या परिसराला तलावाचे स्वरूप आले होते.
पुलाचा भराव खचला
अकोला शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील मोर्णा नदीवरचा पुलाचा भराव पाण्यामुळे खचला. सुदैवाने यावेळी वाहतूक नसल्याने मोठी दुर्घटना टळली. दुपदरी असलेल्या या पुलाच्या उत्तरेकडील बाजूचा भराव खचला. स्थानिक प्रशासनाने तातडीने पुलाची एक बाजू वाहतुकीसाठी बंद केली.
भाजप लोकप्रतिनिधींनी केली पाहणी
आमदार रणधीर सावरकर व गोवर्धन शर्मा यांच्या नेतृत्वात भाजपच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी रात्रभर वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देऊन शहरातील पूरस्थितीचा आढावा घेतला.
अकोला शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील मोर्णा नदीवरचा पुलाचा भराव पाण्यामुळे खचला. सुदैवाने यावेळी वाहतूक नसल्याने मोठी दुर्घटना टळली. दुपदरी असलेल्या या पुलाच्या उत्तरेकडील बाजूचा भरावा खचला. स्थानिक प्रशासनाने तातडीने पुलाची एक बाजू वाहतुकीसाठी बंद केली.
सांगवी खुर्द गावाचा संपर्क तुटला
अकोला तालुक्यात माेर्णा नदीकाठी असलेल्या सांगवी खुर्द गावात पुराचे पाणी शिरल्याने गावाचा उर्वरित भागाशी संपर्क तुटला आहे. नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यात उमेश श्रीकृष्ण मोरे यांचा ट्रॅक्टर वाहून गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
उमरी, सावंतवाडी परिसरही जलमय
शहरातील मोठी उमरी, लहान उमरी, सावंतवाडी, राऊतवाडी, रतनलाल प्लॉट आदी भागातही पावसाचे पाणी साचले होते. सखल भागांमध्ये नाल्यांचे पाणी शिरल्याने अनेकांना रात्रभर जागून काढावी लागली. काही व्यापारी संकुलातील दुकानांमध्येही पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले.
भाजप लोकप्रतिनिधींनी केली पाहणी
आमदार रणधीर सावरकर व गोवर्धन शर्मा यांच्या नेतृत्वात भाजपच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी रात्रभर वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देऊन शहरातील पूरस्थितीचा आढावा घेतला.